Maharashtra Govt Decision: शिक्षकांना मोठा दिलासा! सरकारचा निर्णय; UGC स्केल लागू, वेतन-DA मध्ये भरघोस वाढ

Maharashtra government approves UGC pay scale :सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना सहायक प्राध्यापक पदावरील युजीसी स्केलनुसार मूळ वेतन, महागाई भत्ता आणि अन्य भत्ते मिळणार आहे.
Maharashtra government approves UGC pay scale
Maharashtra government approves UGC pay scaleSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अखेर आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांच्या मागण्यांना हिरवा कंदील देत मोठा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना UGC स्केलनुसार मूळ वेतन (Basic Pay) तसेच महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्ते लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना सहायक प्राध्यापक पदावरील युजीसी स्केलनुसार मूळ वेतन, महागाई भत्ता आणि अन्य भत्ते मिळणार असून शिक्षकांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या भविष्यातील पदभरती प्रक्रियेत या शिक्षकांना १० अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra government approves UGC pay scale
ZP Teachers Transfer: हजारो शिक्षकांना दिलासा! बदल्या पुढे ढकलल्या; सर्व जिल्हा परिषदांना आदेश

आतापर्यंत अनेक शिक्षक तासिका तत्त्वावर किंवा मर्यादित वेतन श्रेणीत काम करत होते मात्र आता सहाय्यक प्राध्यापकांच्या UGC स्केलनुसार वेतन मिळणार आहे. DA वाढीमुळे प्रत्यक्ष हातात येणाऱ्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. याविषयाबाबत अनेक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता, त्याला मान्यता देण्यात आली आहे.

Maharashtra government approves UGC pay scale
Sarkari Naukri News: सरकारी नोकरीसाठी फक्त डिग्री नाही, अनुभवही अनिवार्य; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

“समान काम, समान वेतन”ला बळ

या निर्णयामुळे “Equal Work, Equal Pay” या तत्त्वाला बळ मिळालं आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत करत “यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गेमचेंजर

ही सात आदर्श महाविद्यालये राज्यातील विविध जिल्ह्यांत आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात या निर्णयाचा थेट परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.

Maharashtra government approves UGC pay scale
MPSC: एक परीक्षा, अनेक नोकऱ्या! सरकारचा मोठा निर्णय ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

एकूणच काय?

👉 शिक्षकांना आर्थिक दिलासा

👉 करिअरमध्ये अतिरिक्त संधी

👉 आणि शिक्षण व्यवस्थेला बूस्ट

सात आदर्श महाविद्यालये

जालना जिल्ह्यात घनसांवगी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संलग्न), बुलढाणा (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन (श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई), हिंगोली (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), गडचिरोली (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे येथे (मुंबई विद्यापीठ मुंबई, संलग्न) अशी सात आदर्श महाविद्यालये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com