Raj Thackeray : टोलमुक्तीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंचा कॉन्फिडन्स वाढला! कार्यकर्त्यांना म्हणाले...

Maharashtra Cabinet Decision MNS : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील पाच टोलनाक्यांवर मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Toll Free News : मुंबई टोलमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने केलेल्या आंदोलनाला अखेर सोमवारी यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून केली जाणार आहे. राज ठाकरेंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी मुंबईतील नागरिक तसेच महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन करताना ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला.

Raj Thackeray
Harshvardhan Patil : आधी बंडखोरी आता काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांवर घाव; संजय जगतापांनी केली कोंडी

महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून ठाकरे यांनी लिहिले आहे की, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका.

आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो, किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब असल्याचे ठाकरेंनी नमूद केले आहे.

Raj Thackeray
Eknath Shinde : मुंबईकरांसाठी खुशखबर! पाच प्रमुख टोल नाके बंद; CM शिंदेंचा मोठा निर्णय

राज्य सरकारचे अभिनंदन करताना हा निर्णय केवळ निवडणुकीपुरता ठरण्याची भीतीही ठाकरेंनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असा चिमटा राज ठाकरेंनी काढला.

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही, अशी खंत व्यक्त करताना राज यांनी याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. चौकशी होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com