.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nagpur News : महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे या तिघांनी 5 डिसेंबर रोजी शपथ घेतली होती. तेव्हापासून महायुती सरकारमधील इतर खात्याचं वाटप कधी होणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.
शिवाय विरोधकांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून महायुतीवर टीका करायला सुरूवात केली होती. मात्र, अखेर रविवारी (ता.15) या नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूर (Nagpur) येथे पार पडला. यावेळी एकूण 42 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
महत्वाची बाब म्हणजे या महायुतीच्या (Mahayuti) या मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक समाजाची, तसंच जाती-धर्माची विशेष काळजी घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या विविध समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलनं केली जात आहेत. शिवाय विधानसभा निवडणुकीतही जातीपातीचं राजकारणं झाल्याचं कोणीही नाकारू शकत नाही.
त्यामुळे सरकार चालवताना सर्वच घटकांना सोबत घेऊन काम करावं लागणार असल्याची जाणीव झाल्यामुळेच या सरकारने जातीय समीकरण साधल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार कशा पद्धतीने मंत्रिमंडळात कोणकोणत्या समाजाच्या नेत्यांना संधी दिली आहे ते पाहूया.
चंद्रशेखर बावनकुळे - OBC
गिरीश महाजन - OBC
चंद्रकांत पाटील - मराठा
जयकुमार रावल - राजपूत
पंकजा मुंडे - OBC
पंकज भोयर - कुणबी मराठा
राधाकृष्ण विखे पाटील - मराठा
मंगल प्रभात लोढा - मारवाडी
शिवेंद्रराजे भोसले - मराठा
मेघना बोर्डीकर - मराठा
नितेश राणे - मराठा
माधुरी मिसाळ - OBC
गणेश नाईक - OBC
आशिष शेलार - मराठा
संजय सावकारे - SC
आकाश फुंडकर - कुणबी मराठा ओबीसी
जयकुमार गोरे - माळी- ओबीसी
अतुल सावे - OBCमाळी
अशोक उईके - आदिवासी
संजय सिरसाट - अनुसूचित जाती
उदय सामंत - कायस्थ ब्राह्मण
शंभूराजे देसाई - मराठा
गुलाबराव पाटील - गुर्जर-ओबीसी
भरत गोगावले - ओबीसी मराठा कुणबी
संजय राठोड - ओबीसी बंजारा
आशिष जैस्वाल - ओबीसी बनिया
प्रताप सरनाईक - मराठा
योगेश कदम - मराठा
प्रकाश आबिटकर - मराठा, दादा भुसे
अदिती तटकरे - ओबीसी
नरहरी झिरवाळ - आदिवासी समाज
बाबासाहेब पाटील - मराठवाडा- मराठा
हसन मुश्रीफ - मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा
दत्ता भरणे - धनगर समाज
धनंजय मुंडे - वंजारी -ओबीसी
मकरंद पाटील - मराठा
माणिकराव कोकाटे - मराठा
इंद्रनील नाईक - मराठा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.