

अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाइन आणि गुणवत्तेच्या आधारे होणार आहे.
प्रवेशाच्या फेऱ्या 17 वरून कमी करून 5 करण्यात आल्या आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश शाळास्तरावर ऑफलाइन पद्धतीने होतील.
कोल्हापूर : संतोष मिठारी
महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी असलेल्या इयत्ता अकरावीची राज्य भरातील प्रवेश प्रक्रिया शासनाने गेल्यावर्षी ऑनलाइन केली. त्यामध्ये यावर्षी काही सुधारणा, बदल केले आहेत. यंदा प्रवेशाच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
गेल्या वर्षी केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत प्रवेशाच्या सतरा फेऱ्या झाल्या होत्या. अगदी डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अपुरा कालावधी मिळाला. त्याची दखल घेऊन शासनाने यावर्षी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार राज्य मंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहेत. एचएसव्हीसी व्यावसायिकचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने शाळा स्तरावर होतील.
सर्वसाधारण तीन फेऱ्या गुणवत्तेनुसार होणार आहेत. त्यात सामाजिक, समांतर आरक्षण लागू असेल. यानियमित तीन फेऱ्यांनंतर ओपन टू ऑल विशेष फेरी होईल. त्यात ऑनलाइन पद्धतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील. उर्वरित रिक्त जागांसाठी दोन दिवसांचा कालावधी देऊन विद्याशाखा निवडण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. ओपन टू ऑल या फेरीनंतर मुलींसाठी एक विशेष पाचवी फेरी घेण्यात येईल.
विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे
१) उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चिती होणार.
२) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
३)एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेपैकी प्रत्येक फेरीत एक शाखा निवडता येईल.
४) प्रत्येक फेरीच्यावेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल.
५) समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्म दिनांकानुसार ज्येष्ठतम विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्राधान्य राहील.
यावर्षी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. प्रक्रियेत सुसूत्रता राहावी यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक असा प्रत्येक अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रवेश प्रक्रिया प्रत्येक उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी राबवायची आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल.
-प्रभावती कोळेकर, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग
आकडेवारी दृष्टिक्षेपात
*जिल्हा* महाविद्यालयांची संख्या* एकूण प्रवेश क्षमता
कोल्हापूर* २८७ ६९,११०
सांगली* २३४ ४३,९४२
सातारा* २१६ ४९,७६०
रत्नागिरी* १३९ २५,५१०
सिंधुदुर्ग* ६८ १२,६००
एकूण* ९४४ २,००,९२२
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन...
प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने हेल्पलाईन सुरु केली आहे. ई-मेल dydekop@gmail.com आणि (७०३०५४२४२४) या क्रमांकावर विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल.
1. यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे
यंदा प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि गुणवत्तेच्या आधारे होणार आहे
2. प्रवेशाच्या किती फेऱ्या असतील
यंदा एकूण 5 फेऱ्या असतील
3. गेल्या वर्षी किती फेऱ्या झाल्या होत्या
गेल्या वर्षी 17 फेऱ्या झाल्या होत्या
4. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार
ते शाळास्तरावर ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत
5. या बदलामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होईल
प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.