
Mumbai : मागील काही दिवसांपासून ज्या क्षणाची शिवसैनिक वाट पाहत होते, तो क्षण अखेर आज आला. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असणार की नाही, याबाबत शपथविधीच्या दोन तास आधीपर्यंत संभ्रम होता. अखेर शिंदेंनी आज आझाद मैदानावर पार पडलेल्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी आले. शपथेला सुरूवात करण्यासाठी राज्यपाल मी हा शब्द उच्चारतात. पण त्याआधीच एकनाथ शिंदेंनी बोलण्यास सुरूवात केली. ते बोलत असतानाच राज्यपालांनी मी हा शब्द उच्चारला.
शिंदे यांनी शपथेला सुरूवात करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा उल्लेख केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे स्मरण आणि देशाचे कर्तबगार, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने... असे म्हणून थांबले.
राज्यपालांनी ‘मी’ शब्द पुन्हा उच्चारल्यानंतर शिंदे यांनी प्रत्यक्ष शपथ घेण्यास सुरूवात केली. त्यांचा शपथविधी पूर्ण झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. दरम्यान, तिन्ही नेत्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शपथविधीसाठी राजकीय, उद्योग, सामाजिक, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएतील मित्रपक्षांचे नेते, केंद्रीय मंत्रीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आझाद मैदानात तब्बल 40 हजार जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.