
Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेस चांगलीच बॅकफुटवर आल्याचे पाहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने या पराभवाला कारणीभूत असलेल्याना घरचा रस्ता दाखवला आहे. आता त्यांच्या जागी आलेल्या नव्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीदेखील स्वीकारली आहे. यानंतर आता सपकाळ यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून सोमवारी आणि मंगळवारी दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलवली असून ही बैठक पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला उभारी यावी यासाठी मोठे निर्णय पक्षात घेतले जात आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडच्या दिग्गज नेत्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात येत्या सोमवारी आणि मंगळवारी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी महत्त्वाची आहे.
येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणि कार्यकर्त्यांना उभारी देणं हे काँग्रेसपुढे मोठं आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अपेक्षेपेक्षा फार विरुद्ध लागलेला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला आता पुन्हा उभं करण्याचं आव्हान महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाकडे असणार आहे.
सलग दोन दिवस होणार बैठका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य दिलं आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनताच आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवारी 24 फेब्रुवारी २०२५ ला दुपारी तर मंगळवारी 25 फेब्रुवारीला देखील दुपारी बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या हॊणाऱ्या या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्या मोठ्या घडामोडींचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे या बैठकीवेळी सोमवारी मुंबईत पडद्यामागे नेमके काय घडतंय? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.