Maharashtra drought : राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादीच समोर

Maharashtra drought affected talukas list 2026 : महाराष्ट्रात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादी आणि दुष्काळाबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
Maharashtra drought : राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादीच समोर
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

पावसाअभावी राज्यातील १३७ लाख हेक्टरपैकी सुमारे ९० लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली. या पार्श्वभूमीवर पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड आणि सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी स्थिती आहे. कृषी विभागाने हा अहवाल सरकारला सादर केला आहे. दुसरीकडे, दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी या तालुक्यांची यादी ‘एमएनसीएफसी’ला (महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र) दिली आहे.

दुष्काळाची पहिला ट्रिगर निश्चित करण्यासाठी पर्जन्यमानाचे विचलन, पावसातील खंड व जून-जुलैमधील सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी, जून ते सप्टेंबरमधील सरासरी पाऊस विचारात घेतला जातो. यानुसार २७ जिल्ह्यांमधील १३९ तालुक्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त आहे. पण, हलक्या जमिनीसाठी किमान २१ दिवसांचा आणि भारी जमिनीसाठी २८ दिवसांचा खंड विचारात घेतला जातो.

Maharashtra drought : राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादीच समोर
Abhijeet Dipke on Protest : ज्ञानेश कुमारांच्या विरोधात CJP आक्रमक, आंदोलनाची तारीख अन् जागा जाहीर, दीपके म्हणतात - 'उद्यापर्यंत...'

जिल्हानिहाय जमिनीचे वर्गीकरण करून त्यानुसार हलकी व भारी जमिनीतील खंड विचारात घेऊन तालुक्यांची संख्या निश्चित करावी लागेल, असेही ‘कृषी’च्या अहवालात नमूद आहे. सात जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि १७५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्केसुद्धा पाऊस झाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार राज्यातील १७५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होऊ शकतो, अशी सद्य:स्थिती आहे.

‘पहिल्या ट्रिगर’चे विभागीयनिहाय तालुके

१. ठाणे विभाग : ठाण्यातील कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ. रायगडमधील पनवेल, कर्जत, पेण. पालघर जिल्ह्यातील वडाळा डहाणू, तलासरी, विक्रमगड.

२. पुणे विभाग : अहिल्यानगरमधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोला, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता. पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, वेल्हे, खेड, राजगुरूनगर, शिरूर घोडनदी, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर सासवड. सोलापुरातील बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिस, मंगळवेढा.

Maharashtra drought : राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादीच समोर
Raj Thackeray on Gyanesh Kumar : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंचा घणाघात, ज्ञानेश कुमारांसह सरकारवर ओढले आसूड

३. नाशिक विभाग : नाशिकमधील इगतपुरी, मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, सिन्नर, येवला, देवळी. धुळ्यातील धुळे शिक्री, शिरपूर, शिंदखेडा. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अकराणी. जळगावमधील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, इदलाबाद, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, जामनेर, पाचोरा, भांडगाव, धरणगाव, बोधवाडा.

४. कोल्हापूर विभाग : साताऱ्यातील पाटण, खटाव-वडूज, माण-दहिवडी, फलटण, खंडाळा. सांगलीतील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ. कोल्हापूरमधील चंदगड, राधानगरी.

५. छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, शिल्लोड, सोयगाव. जालन्यातील अंबड, परतूर, बदनापूर, घनसांगवी, मंठा. बीडमधील अष्टी, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, शिरूर कासार.

६. लातूर विभाग : लातूरमधील रेनापूर, धाराशिवमधील धाराशिव, तुळजापूर, परांडा, भूम. परभणीतील पाथरी, मानवत.

७. अमरावती विभाग : बुलढाण्यातील जळगाव जामोद, बुलढाणा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा. अकोल्यातील बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी. वाशिममधील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा. अमरावतीतील भातकुली, दर्यापूर. यवतमाळमधील दारवा.

८. नागपूर विभाग : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी. गोंदियातील तिरोडा, सेकसी. गडचिरोलीतील कुरखेडा, धानोरा व इटापल्ली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com