Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्तच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांसाठी मोठी बातमी; CM फडणवीसांनी दिला शब्द...

Drought affected talukas not in first list Maharashtra : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला मोठा दिलासा; निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष.
 Cm Devendra Fadnavis
Cm Devendra Fadnavissarkarnama
Published on: 
Updated on: 

दुष्काळाच्या पहिल्या यादीत नाव नसलेल्या तालुक्यांसाठीही सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत महत्त्वाचे निर्देश दिले असून, केवळ तांत्रिक निकषांवर निर्णय न घेता प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे स्पष्ट केले आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी मोठी बातमी

राज्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात काही भागांत चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी पिकांना फटका बसला. पावसाअभावी उभी पिके करपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 Cm Devendra Fadnavis
IAS Divya Mittal : IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेल्या दिव्या मित्तल अखेर राजकारणात येणार, काँग्रेस की भाजप? जाहीर केली भूमिका

राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 लागू झाल्याने या तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच राज्यातील सुमारे 75 टक्के भाग दुष्काळाच्या कक्षेत आला आहे. या तालुक्यांसाठी शासनाने विविध सवलती आणि उपाययोजनांची घोषणा केली आहे.

मात्र ज्या तालुक्यांमध्ये ठराविक तांत्रिक निकष पूर्ण झाले नाहीत, अशा भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्र्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा मांडला.

फक्त कागदावरील आकडे नकोत; प्रत्यक्ष पाहणी होणार

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. केवळ कागदोपत्री निकषांच्या आधारे दुष्काळाचा निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या भागात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या दुष्काळग्रस्त यादीत नाव नसलेल्या तालुक्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 Cm Devendra Fadnavis
Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी शिक्षक अडकले; शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय

विशेष म्हणजे ही पाहणी केवळ तालुका पातळीवर मर्यादित न ठेवता मंडळ स्तरावरही करण्याचा विचार आहे. त्यामुळे एखाद्या तालुक्यातील काही भागात मोठे नुकसान झाले असेल, तर त्या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती स्वतंत्रपणे तपासता येणार आहे. यामुळे दुष्काळग्रस्त यादीत नसलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com