Maharashtra Farmer Loan Waiver : महाराष्ट्र सरकारने जून 2026 मध्ये 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्यात येणार असून, राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे तब्बल 36,585 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.
सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने मागील कर्जमाफी योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, यंदाच्या कर्जमाफी योजनेत यापूर्वी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरली आहे.
माहितीनुसार, 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने तब्बल 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या निर्णयामुळे जवळपास याआधी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या संदर्भातील निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.