Maharashtra Rain : धाराशिव, बीडसह 7 जिल्ह्यांतील पुरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी; अखेर सप्टेंबरचा GR आला...

Seven Districts Including Dharashiv and Beed to Receive Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत केला जाणार आहे. सर्वाधिक 577 कोटींहून अधिक निधी बीड जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे.
“Maharashtra government allocates ₹1356 crore to compensate flood-hit farmers in Dharashiv, Beed, and other districts after heavy September rains.”
“Maharashtra government allocates ₹1356 crore to compensate flood-hit farmers in Dharashiv, Beed, and other districts after heavy September rains.”Sarkarnama
Published on
Updated on

 September Rainfall Damage Report and Assessment : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून सातत्याने जाहीर केले जात होते. तशी मदत शेतकऱ्यांना देण्यास सुरूवात झाल्याचा दावाही सरकारकडून केला जात आहे. आता सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी 1 हजार 356 कोटी 30 लाख 22 हजार रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

महसूल विभागाकडून गुरूवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला होता. नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतपिकांसह शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले. सरकारने गुरूवारी काढलेल्या जीआरनुसार या जिल्ह्यांना मदत जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात हा निधी वितरीत केला जाणार आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत केला जाणार आहे. सर्वाधिक 577 कोटींहून अधिक निधी बीड जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक शेतकरी बाधित असून 644918.55 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ही मदत 292 कोटींहून अधिक आहे.

“Maharashtra government allocates ₹1356 crore to compensate flood-hit farmers in Dharashiv, Beed, and other districts after heavy September rains.”
Supreme Court : CJI गवईंनी ‘तो’ विषय संपवला, पण मोदी सरकार कारवाईवर ठाम; दिवाळीनंतर फैसला

परभणी जिल्ह्यातील 4 लाख 39 हजार 297 शेतकऱ्यांना 245 कोटींहून अधिक, लातूर जिल्ह्यातील 4 लाख 15 हजार 492 शेतकऱ्यांना 202 कोटींहून अधिक तर नांदेड जिल्ह्यातील 83 हजार 267 शेतकऱ्यांना 28 कोटींहून अधिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशाप्रकारे छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 1346 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे.

“Maharashtra government allocates ₹1356 crore to compensate flood-hit farmers in Dharashiv, Beed, and other districts after heavy September rains.”
Donald Trump Aadhar card : डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड काढलं 20 रुपयांत; Live दाखवलं... कशी होते बोगस मतदार नोंदणी?

पुणे विभागासाठी केवळ 9 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 11 हजार 113 शेतकऱ्यांना 6 कोटी 29 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5 हजार 860 शेतकऱ्यांना 3 कोटी 18 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक नुकसान मराठवाड्यामध्ये झाले होते. प्रामुख्याने धाराशिव आणि बीड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले होते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com