Sharad Pawar: माजी गृहमंत्र्यांच्या मुलाचा शरद पवारांना रामराम! तडकाफडकी दिला राजीनामा; राष्ट्रवादीला मोठा धक्का

Sharad Pawar NCP : आता ते दादांच्या राष्ट्रवादीत जातात की भाजपचे कमळ हाती धरतात याची उत्सुकात सर्वांना लागली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar NCP : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी आज तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला. तब्येतीच्या कारणामुळे सहा महिने आराम करायचा, पक्षाला वेळ देता येत नसल्यामुळे आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तब्येत चांगली झाल्यावर सहा महिन्यानंतर काय करणार अशी विचारणा केली असता त्यांनी त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असे सांगून त्यांनी सर्वांसाठी आपली दारे खुली ठेवली असल्याचे दिसून येते. आता ते दादांच्या राष्ट्रवादीत जातात की भाजपचे कमळ हाती धरतात याची उत्सुकात सर्वांना लागली आहे.

Sharad Pawar
'पान टपरी' व्यावसायिकांनो छुप्या पद्धतीनं गुटखा विकताय? होणार जबर कारवाई

सलील देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. विदर्भाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मागची जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी जिंकली होती. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्या ऐवजी सलील देशमुख यांनी निवडणूक लढली होती. मात्र ते पराभूत झाले. तीन महिन्यांपूर्वी त्यांची तब्येत अचानक खराब झाली होती. सुमारे महिनाभर ते इस्पितळात दाखल होते. या दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्पितळात जाऊन त्यांची भेट घेतली होती. अजित दादा यांच्यासोबत देशमुख कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे बघता ते दादांच्या राष्ट्रवादीत जातील असा तर्क लावला जात आहे.

Sharad Pawar
Mundhava Land Scam: मुंढवा जमीन घोटाळ्यात नोंदणी अधिकाऱ्याचा प्रताप! असा केला गैरवापर? वाचा Inside Story

सध्या नगर पालिका आणि नगर परिषदेची धामधूम नागपूर जिल्ह्यात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही बैठकांना सलील देशमुख उपस्थित होते. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही तर आम्ही समविचारी पक्षासोबत युती करू असे पत्रक त्यांनी काढले होते. आठ दिवसांपासून सक्रिय असताना अचानक राजीनामा देऊन देशमुख यांनी सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे त्यांनी राजीनामा नेमक्या कोणत्या कारणासाठी दिला आणि कुठल्या पक्षात ते जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
Sanjay Mandlik News: एकाकी पडलेल्या मंडलिकांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'कोणाला वाड्यावरचं आरक्षण उठवायचं तर एकाला ईडीची...'

अनिल देशमुख यांनी सुमारे पंचवीस वर्षे काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सलग ते पंधरा वर्षे मंत्री होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अडीच वर्षे अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. २०२४ची निवडणूक पुन्हा लढण्यासाठी अनिल देशमुख सज्ज झाले होते. तत्पूर्वी, सलील देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र राजकीय परिस्थिती बघता शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचे नाव जाहीर केले होते. कोणाला लढायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार देशमुख कुटुंबीयांना दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com