Maharashtra Government : शिंदे, फडणवीस, अजितदादा होणार ‘या’ 9 कंपन्यांवर मेहेरबान?

Recruitment in Maharashtra Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis : शिंदे सरकारने मागील वर्षी या नऊ सेवा पुरवठादार कंपन्यांमार्फत भरती करण्याचा निर्णय रद्द केला आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून पुन्हा कंत्राटी भरतीला सुरूवात केली जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातून मागील वर्षी निवडण्यात आलेल्या 9 कंपन्यांचे उखळ पांढरे होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातील काही कंपन्या थेट राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने नेमका ‘रोजगार' कुणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी नऊ कंपन्यांचे पॅनेल तयार करून त्यामार्फत कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर बरीच ओरड झाल्यानंतर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. कंपन्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. तसेच काही संघटनांनीही आंदोलन करत भरतीला विरोध केला.

या भरतीतून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल या कर्मचाऱ्यांना रोजगार दिला जाणार होता. त्यानुसार संबंधित नऊ कंपन्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. काही कंपन्या आयटी क्षेत्रातील असून काही कंपन्या सरकारसह विविध खासगी संस्थांना मनुष्यबळाचा पुरवठा करत आहेत. काही राजकीय नेत्यांच्या कंपन्यांकडून राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांसह शासकीय विभागांना सुरक्षारक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जात आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Contract Recruitment Decision : फसवाफसवी : शिंदे-फडणवीस सरकारची ठेकेदारी, प्रशासनात कंत्राटी भरतीची नफेखोरी?

पुन्हा एकदा सरकारने भरतीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून याच नऊ कंपन्यांना पुन्हा या प्रक्रियेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मागील वर्षी विरोधक व बेरोजगारांच्या रेट्यामुळे या कंपन्यांना दाखवलेला बाहेरचा रस्ता पुन्हा छुप्या मार्गाने खुला केला जाणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या आहेत ‘त्या’ नऊ कंपन्या -

- ॲक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड – मुंबईत नरीमन पॉईंट येथे कार्यालय असून ही कंपनी आयटी बिझनेसमध्ये आहे. विविध क्षेत्रात आयटीशी संबंधित कामांमध्ये कंपनी सक्रीय आहे.

- सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. – बेंगलुरू येथे कार्यालय आहे.

- सी.एस.सी. ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत संचलित सेवा पुरवठा संस्था आहे. या माध्यमातून विविधे सेवा पुरवल्या जातात.

- इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि. – विविध आयटी सेवा पुरवठादार कंपनी असून मुंबईत मुख्यालय आहे. तसेच दिल्ली, पुणे आणि नागपुरातही कार्यालये आहेत.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Bhujbal Meet Pawar : साथ सोडली तरी भुजबळांचा आजही पवारसाहेबांवर लईच भरोसा

- क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. – मुंबईत दादरमध्ये शिवसेना भवनसमोर मुख्य कार्यालय आहे.

- एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल लि. – मुंबईत नरीमन पॉईंट येथे कार्यालय आहे.

- सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. – मुंबईत भायंदर येथे कार्यालय आहे.

- सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. – मुंबईत अंधेरी येथे कार्यालय आहे.

- उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि. – कंपनीचे मुख्यालय बिहारमधील पटना येथे आहे. तसेच दिल्ली, नागपूर, बेंगलुरू, भोपाळमध्येही कार्यालये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com