OBC Students: सरकारचा मोठा निर्णय! ओबीसी, भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता वाढला; महिन्याला मिळणार इतके रुपये

OBC Students Allowance Student: महाराष्ट्र सरकारने ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
OBC Students Allowance Student
OBC Students Allowance StudentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Student Allowance Hike: शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दरमहा ६०० रुपयांऐवजी १३०० ते १५०० रुपयांपर्यंत निर्वाह भत्ता मिळणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल (बुधवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाची माहिती दिली.

विभागीय आणि जिल्हास्तरावरील किती भत्ता मिळणार?

सरकारने वसतिगृहांच्या ठिकाणानुसार निर्वाह भत्त्याची रक्कम निश्चित केली आहे. यापूर्वी विभागीय आणि जिल्हास्तरीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा प्रत्येकी ६०० रुपये दिले जात होते. आता या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

नव्या निर्णयानुसार विभागीय स्तरावरील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १५०० रुपये निर्वाह भत्ता मिळेल. तर जिल्हास्तरावरील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १३०० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भोजन, दैनंदिन गरजा आणि इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे.

OBC Students Allowance Student
Congress News: काँग्रेसचा 215 पदाधिकाऱ्यांना दणका! महारॅलीला दांडी मारणं भोवलं! उपस्थितीवर होती डिजिटल नजर

कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

या निर्णयाचा फायदा केवळ ओबीसी विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून इतर मागास प्रवर्गासह विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी आपल्या गावापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन खर्चाचा भार कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

OBC Students Allowance Student
Shiv Sena Disqualification: भाजपचा शिवसेनेला दणका! चार नगरसेवकांच्या अपात्रतेचा ठराव मंजूर; नेमकं काय घडलं?

राज्यात ७२ शासकीय वसतिगृहे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र अशी एकूण ७२ वसतिगृहे चालवली जातात. या वसतिगृहांमधून संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

मात्र, वाढत्या महागाईच्या काळात दरमहा मिळणारा ६०० रुपयांचा निर्वाह भत्ता अपुरा पडत होता. त्यामुळे सरकारने आता या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या पालकांवरील खर्चाचा काही प्रमाणात भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.