MPSC : मोठा फैसला! सरकारी भरतीत मुलाखत पद्धतीला रामराम; ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना लगाम

Maharashtra Government Jobs : राज्य सरकारने सरकारी भरतीत प्रक्रियेत मोठा बदल करत सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला आहे.
MPSC Exam
MPSC Exam Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाराष्ट्र 2047 व्हिजन अंतर्गत भरती प्रक्रियेत मोठे बदल

  2. गट ब आणि गट क पदांसाठी मुलाखती रद्द करण्याचा निर्णय

  3. सरळसेवा भरती प्रक्रिया आता एमपीएससीकडे सोपवण्यात आली

Maharashtra MPSC News : राज्य सरकारने “किमान शासन आणि कमाल प्रशासन” असे उद्दिष्ट ठरवत सरकारी भरतीत प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे आता गट-अ ते गट-क या संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणली गेली आहेत. तर आता गट ब आणि क च्या भरतीसाठी मुलाखत घेतली जाणार नाही.

राज्यात सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करताना राज्य सरकारने “किमान शासन आणि कमाल प्रशासन” या उद्दिष्टानुसार आराखडा तयार केला आहे. तर पारदर्शक, भविष्योन्मुख आणि नागरिक-केंद्रित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदभरती प्रक्रियेतच सुधारणा करण्यात आली आहे.

याप्रमाणे भरती प्रक्रियेतील मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. सरळसेवा भरती प्रक्रिया आता एमपीएससीकडे देण्यात आली आहे. याप्रमाणे आता वर्ग अ, वर्ग ब सोबतच वर्ग क ची कर्मचारी भरतीही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मार्फत केली जाईल. तर गट ब (अराजपत्रित अधिकारी) आणि गट क च्या निवडीवेळी मुलाखती होणार नाहीत.

MPSC Exam
MPSC Result: MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर! आरती जाधव महिलांमध्ये पहिली, टॉपर ठरला विजय लमकाने

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता वेगवेगळ्या विभागांकडून होणाऱ्या स्वतंत्र भरती प्रक्रियेत होणारी गुंतागुंत, विलंब आणि विसंगती टळणार आहे. तसेच समान स्वरूपाच्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षांही आता होणार नाहीत. यामुळे उमेदवारांवरील मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण कमी होण्यास मदत मिळेल.

शासनाने भरती प्रक्रियेत बदल करत एकूण ५५३ संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. तर याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. हा निर्णय नव्याने निघणाऱ्या भरतींसाठी लागू असेल. तर आधीच सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला हा लागू नसेल.

दरम्यान आता विभागीय कर्मचाऱ्यांना संधी देणारा निर्णयही घेण्यात आला आहे. ज्यात पदे थेट मुलाखतीने भरण्याऐवजी काही राजपत्रित व अराजपत्रित पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे घेतले जातील. ज्यामुळे कालबाह्य पदे ही मृत संवर्गात जातील.

‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना चाप

राज्य सरकारने “किमान शासन आणि कमाल प्रशासन” या उद्दिष्टात सरकारी भरतीत प्रक्रियेत बदल केला आहे. आता गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क पदांसाठी मुलाखती पूर्णपणे रद्द केल्या आहेत. यामुळे मुलाखतींच्या आडून होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना चाप बसणार असून निवड प्रक्रिया ही फक्त लेखी परीक्षेवर आधारित असेल.

MPSC Exam
Cabinet Meeting Decision : MPSC परीक्षेत मोठा बदल अन् मुंबईकरांना नवं विद्यापीठ मिळणार!; फडणवीसांच्या 'कॅबिनेट'चे गेमचेंजर निर्णय

FAQs :

1. महाराष्ट्र 2047 व्हिजनमध्ये काय बदल आहेत
भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत

2. कोणत्या पदांसाठी मुलाखती रद्द केल्या आहेत
गट ब (अराजपत्रित) आणि गट क पदांसाठी मुलाखती रद्द

3. भरती प्रक्रिया कोणाकडे सोपवली आहे
एमपीएससीकडे भरती प्रक्रिया सोपवली आहे

4. या निर्णयाचा फायदा कोणाला होईल
नोकरी इच्छुकांना पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया मिळेल

5. सरकारचा उद्देश काय आहे
किमान शासन आणि कमाल प्रशासन सुनिश्चित करणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com