Maharashtra Rain : अतिवृष्टीची भीती; पुढील 3 दिवस ‘हे’ आपत्कालीन क्रमांक तुमच्याकडे असायलाच हवेत...

Maharashtra Weather Alert: Heavy Rainfall Till September 30 : नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Heavy Rain Alert
Flooded street in Maharashtra after heavy rain, highlighting the urgent need for disaster management and rainfall preparedness.Sarkarnama
Published on
Updated on

Emergency Helpline Numbers Released by State Disaster Control Room : मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलेल्या महाराष्ट्राला पुढील तीन दिवसही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झाले असून आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या भागांतील दुरध्वनी क्रमांक प्रसिध्द केले आहेत.

भारतीय हवामान विभागाने 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे पुराच्या धोक्याची शक्यता आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Heavy Rain Alert
Medha Kulkarni News : तरुणाई नासवणारा कार्यक्रम, आता थांबणार नाही! मेधा कुलकर्णींचा संताप, थेट फडणवीसांकडे जाणार...

संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्हयांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे -

धाराशीव - ०२४७२-२२७३०१, बीड - ०२४४२-२९९२९९, परभणी - ०२४५२-२२६४००, लातूर - ०२३८२ २२०२०४, रत्नागिरी - ७०५७२२२३३, सिंधुदुर्ग - ०२३६२ २२८८४७, पुणे - ९३७०९६००६१, सोलापूर - ०२१७-२७३१०१२, अहिल्यानगर - ०२४१-२३२३८४४, नांदेड - ०२४६२-२३५०७७, रायगड- ८२७५१५२३६३, पालघर – ०२५२५- २९७४७४, ठाणे – ९३७२३३८८२७, सातारा - ०२१६२ २३२३४९, मुंबई शहर आणि उपनगर - १९१६/०२२६९४०३३४४.

Maharashtra Heavy Rain Alert
Maharashtra Flood 2025 : पावसाचा धुमाकूळ; 2019 मधील शहांच्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्राला कधी? मोदींचंही ठरेना...

राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी या केंद्रामध्ये २४ तास अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यांचे दुरध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३ या क्रमांकांवर तुम्हाला संपर्क साधता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com