IAS Transferred : 3 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; MMRDA आणि महापारेषणात फेरबदल

Maharashtra IAS officer transfers 2026 : पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला धक्का दिला असून तीन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
IAS Transferred
IAS Transferred Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 3 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोमवारी (ता.२२) रात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या बदल्यांच्या आदेशात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महापारेषण यांसारख्या महत्त्वाच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील 12 बड्या सनदी अधिकाऱ्याची बदल्या केल्या होत्या. ज्यात आयएएस अधिकारी विजय सिंघल यांच्यासह, अश्विनी जोशी, दीपेंद्रसिंग कुशवाह, अश्विन मुदगल, वेलारसू यासारख्या बड्या अधिकाऱ्यांच्या यात समावेश होता. यानंतर आता या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच अशाच बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशामुळे आता प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून आयएएस संजीव कुमार यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transferred
Pankaj Deore Transferred : IAS पंकज देवरे यांना 9 महिन्यातच हटवलं; 6 वर्षात PMPML च्या आठ अध्यक्षांची बदली

तर पी.वेलारासू यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. दरम्यान वेलारासू यांची गेल्याच आठवड्यात एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून वन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती.

IAS Transferred
IPS Transfer : आमदार बापू पठारेंच्या जावयासह ३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द : अवघ्या ५ दिवसांत गृह विभागाचा 'युटर्न'!

मात्र वनविभागातील अधिकाऱ्यांनी वेलारासू यांना सचिव म्हणून रिपोर्ट करण्यास नकार दिला. यामुळे आता वेलारासू यांची नियुक्ती आता MMRDA च्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com