Pankaj Deore Transferred : IAS पंकज देवरे यांना 9 महिन्यातच हटवलं; 6 वर्षात PMPML च्या आठ अध्यक्षांची बदली

Mahesh Awhad PMPML Chairman changed in nine months: अवघ्या नऊ महिन्यापूर्वी पीएमपीएमएलचा कारभार हाती घेणाऱ्या पंकज देवरेंची बदली करण्यात आली आहे.
IAS Pankaj Deore transfer from PMPML
IAS Pankaj Deore transfer from PMPMLSarkarnama
Published on
Updated on

PMPML chairman transfers in last six years: पीएमपीच्या अध्यक्ष IAS पंकज देवरे यांची बदली करण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूकीचा कणा असलेल्या पीएमपीएलच्या कुठल्याही अध्यक्षाला मागील सात वर्षात आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. सहा वर्षात तब्बल आठ अध्यक्षांची नियुक्ती आणि बदली झाली आहे.

पीएमपीच्या अध्यक्षपदाची सुत्र आता IAS महेश आव्हाड यांच्याकडे असतील. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या सीईओपदावरून आव्हाड यांची बदली पीएमपीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

जुलै 2025 मध्ये पंकज भोयर यांनी पीएमपीच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतली होती. मात्र, अवघ्या नऊ महिन्यातच त्यांची बदली करण्यात आली आहे. पीएमपीची रचना, कामाची पद्धत आणि प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी अध्यक्षांना काही महिने लागतात. पंकज देवरे यांनी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर पीएमपीच्या कामाला गती आली होती.

IAS Pankaj Deore transfer from PMPML
Farooq Abdullah Firing : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, लग्न समारंभातून बाहेर पडताच झाडल्या गोळ्या

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये अनियमितता असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आता, त्यांच्या बदलीमुळे पीएमपीच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, नवे पीएमपी अध्यक्ष IAS महेश आव्हाड हे आज (गुरुवारी) आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

IAS Pankaj Deore transfer from PMPML
Prakash Ambedkar: RSSच्या कार्यालयावर मोर्चाची प्रकाश आंबेडकरांकडून तयारी सुरु; म्हणाले, कोणीही यावं अन् मोदींना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com