मोठी बातमी : नव्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या तारखांची घोषणा; वाद सुरु असतानाच मुरलीधर मोहोळांसह कुस्तीगीर संघ लागला कामाला

Maharashtra Kesari : पुण्यातील वाघोली येथे ६८ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार आहे. चंद्रहार पाटलांचे आंदोलन स्थगित झाले असून, मुरलीधर मोहोळ यांनी स्पर्धेच्या भव्य आयोजनाची घोषणा केली आहे.
Central Minister Murlidhar Mohol and organizers performed the 'Gada-Pujan' for the 68th Maharashtra Kesari.
Central Minister Murlidhar Mohol and organizers performed the 'Gada-Pujan' for the 68th Maharashtra Kesari.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Kesari : दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून वाद सुरु असतानाच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने रामकृष्ण सातव यांनी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे आयोजन केले आहे.

तारखांची घोषणा :

येत्या १८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (11 मार्च) ‘महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण व मानाच्या गदेचे पूजन करण्यात आले.

बोधचिन्ह अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. या स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण यावेळी त्यांना देण्यात आले. समारोपाला उपस्थित राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

सुनेत्रा पवारांनी पूजली 'मानाची गदा'

आगामी 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली. "कुस्ती ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे, अशा प्रतिष्ठित स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते," अशा भावना व्यक्त करून त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद :

राज्यात कुस्ती संघटनांमधील वादामुळे वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन-तीन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने पैलवानांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा मानबिंदू असलेली महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा राज्यस्तरावर एकच घेण्यात यावी, अशी कुस्तीपटूंची प्रमुख मागणी आहे.

यामुळे एक राज्य, एक संघटना, एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही भूमिका घेवुन डबल महाराष्ट्र केसरी पाटील, हिंदकेसरी वेताळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर पैलवानांनी आंदोलन सुरु केले होते. त्याची दखल घेवुन मंत्री भरणे यांनी संबंधितांना मंत्रालयात बोलावुन त्यांच्याशी चर्चा केली. पुढील आठवड्यात त्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com