Maharashtra Political Live Update : कृत्रिम पावसाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरचा : जयकुमार गोरे

Political Breaking Live Headlines Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आलेल्या जयदीप मेघराज नेमाडे (वय 25) या तरूणाचा मृत्यू झाला आहे. यासह दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

'पावसाळा आला की अशा छत्र्या उगवतात' - पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा रणजितसिंह मोहिते पाटील यांना टोला

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. भाजपचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाभर गाठीभेटी आणि बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नाही असं होत राहतं, पावसाळा आला की छत्र्या उगवतात. याबाबतीत अधिकचं बोलणं उचित नाही. शेवटी जिल्हा बँक ही सोलापूर वासियांची बँक आहे. पालकमंत्री म्हणून मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथं काम करतो, त्यामुळे जिल्हा बँकेतलं मला अधिक काही समजत नाही, असेही ते म्हणालेत.

कोयना धरणातून कृष्णा नदीत अडीच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार : चंद्रकांत पाटील

कृष्णा नदीसह जत, मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या मध्यम प्रकल्पांतील पाणी उपसावर ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कृष्णाकाठसह जिल्ह्यातील शेती पिके धोक्यात येणार आहेत. तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याचं सांगत कोयना धरणातून कृष्णा नदीत अडीच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णानदीसह तलावातून शेतीच्या पाण्यावर उपासा बंदी

सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट गडद होऊ लागला आहे. कृष्णा नदी आणि जिल्ह्यातल्या पाण्याचा साठा लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शेतीसाठी पाणी उपसावर बंदी घालण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर पाणी उपसा हो नाही यासाठी खाजगी उपसा सिंचन योजनांच्या वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाकडून वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना काग्रेसचा घेराव... शेतकरी प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी

बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जिल्ह्यातील पावसाअभावी निर्माण झालेली पीक परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, कर्जमाफी आणि पीकविम्यासह विविध प्रश्नांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच कृषिमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव घालत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

कृत्रिम पावसाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरचा : जयकुमार गोरे

कृत्रिम पावसाच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रात आजपर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. पण त्याला तेवढं यश आलेलं आपण बघितलं नाही. पण कृत्रिम पावसाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवरचा आहे. फडणवीस त्याबाबत निर्णय घेतील, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

कासव हा माझी प्रेरणा आहे : देवेंद्र फडणवीस

कासव हा माझी प्रेरणा आहे. कासव हा कायम चालत राहतो. त्याप्रमाणे मी नेहमी काम करत राहतो. कोणी दगड मारला की कवचात जातो आणि पुन्हा बाहेर येऊन कामाला लागतो. माझी चाल ही कासवाप्रमाणे नाही तर वेगवान आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

राज्यात दुष्काळी स्थिती; विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, त्यापार्श्वभूमीवर महायुती सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. कर्नाटक सरकारचा दाखला देत ही मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

Pratap Sarnaik : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान बसेसचा समावेश असून, सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्होल्वो बस समाविष्ट होत आहेत.

Dattatray Bharne : पीक नुकसानीचा सखोल आढावा घेणार

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, त्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमरावती विभागात नुकत्याच झालेल्या बैठकीत पाच जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमधील पीक नुकसानीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात व्यस्त

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अकोल्यात दुष्काळ आढावा बैठक गेतली. या बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर भरणेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis : राहुल गांधींनी स्टँड अप कॉमेडियनचे काम सुरू करावे

राहुल गांधी यांनी स्टँड अप कॉमेडियनचे काम सुरू केले आणि मिमिक्री केली तर त्यांना चांगला रोजगार मिळेल. त्यांनी आधीच काँग्रेसला बेरोजगार केले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अमित ठाकरे गणपती दर्शनासाठी पुण्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. दरम्यान, रविवारमुळे आज पुण्यात बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Latur Update : लातूर-नांदेड महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला; दोन लाखांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी लातूर-नांदेड महामार्ग वरच्या सांगवी सुनेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान खंडाळी येथे व्यंकट पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागच्या चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत, यांच्या समर्थनार्थ परिसरातील शेतकरी महामार्गावर उतरले आहेत, तर यावेळी महामार्गावर वाहतूक खोळंबी होती.

Amravati Farmer : काजू-बदामाच्या वादानंतर, आता बैठकीला फक्त चहा-पाणी

कृषिमंत्र्यांच्या बैठकीत काजू-बदाम ठेवल्याच्या, त्या मुद्द्यावरून गदारोळ उठल्यानंतर अकोल्यातील कृषीमंत्र्याच्या बैठकीत प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे समोर आले. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृह सुरू होत असलेल्या अमरावती विभागाची दुष्काळ आढावा बैठकीत कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले नाही. मंत्री, खासदार आणि आमदारांना फक्त चहा आणि पाणी बैठकीत पुरवण्यात आलेत. बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री संजय राठोड, मंत्री आकाश फुंडकर अशोक उईके, आणि इंद्रनील नाईक उपस्थित. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बैठकीला ऑनलाइन उपस्थित होत्या.

Hingoli Farmer : वीजवितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू; ऊर्जा मंत्र्यांचा गुन्हा नोंदवण्याच आदेश

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पारडी गावात वीज कर्मचाऱ्याने स्वतःचे कर्तव्य नाकारत विजेची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्याला विद्युत रोहित्रावर पाठवले. मात्र अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने उमद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शेकडो ग्रामस्थांनी वीज वितरण अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत राज्यमार्ग रोखून धरला. ऊर्जामंत्री जोपर्यंत शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचा आदेश देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला.

Shirdi Crime : दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा 11 दुचाकींसह जेरबंद

शिर्डी शहरासह परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका अट्टल चोराला शिर्डी पोलिसांनी जेरबंद केल. विशाल रतन चव्हाण असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल चोरीच्या 11 महागड्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे चोरलेल्या गाड्या शिर्डी, पैठण, बीड , छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, नगरदेवळा आणि सोयगाव या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. शिर्डी पोलिसांच्या या कारवाईमुळे शिर्डीसह श्रीरामपूर, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण आणि नेवासा पोलीस ठाण्यांमधील चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने आणखी किती ठिकाणांहून दुचाकी चोरल्या याचा तपास शिर्डी पोलिस करत आहेत.

अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या नवी वाहने 

शासनाच्या निर्णयानुसार विभागीय सहनिबंधक, लेखापरीक्षणाच्या कार्यालयांसाठी विभागनिहाय सात वाहने, तर पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसाठी प्रत्येकी वाहनाचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयांसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, सांगली, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, बुलढाणा, रत्नागिरी, पुणे शहर, धुळे आणि नाशिक या कार्यालयांसाठी १२ वाहने देण्यात येणार आहेत. मुंबईतील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासाठीही एक वाहन देण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेत चहापानावर लाखो रुपयांची उधळपट्टी

पुणे महापालिकेतील समित्यांच्या बैठकीत चहापानावर लाखोंची उधळपट्टी झाल्याचा खळबळजनक प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आलाय. निविदेविना याची बिल मंजूर केल्याचा आरोप असून, आतापर्यंत 3 लाख 20 हजार रुपयांचा खर्च चहा-पाण्यावर झाला आहे.

छात्रों की गूंज मधील पाचही मुद्दे खरे - उदित राज

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाबाबत काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की, "...नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे, शाळा बंद पडणे, शिक्षण क्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतुदीत कपात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित व्यक्तींची कुलगुरू आणि प्राध्यापक म्हणून नियुक्ती, तसेच विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई—या सर्व गोष्टींना तुम्ही खोटे कसे म्हणू शकता? राहुल गांधींनी या कार्यक्रमात बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसह याच मुद्द्यांवर आवाज उठवला. त्यांनी गरिबी आणि बेरोजगारीबद्दलही भाष्य केले."

मदतीअभावी तरुण शेतकऱ्यांचा संताप; सरकारला इशारा

यवतमाळ जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय,सरकारने भरीव मदत न केल्यास गळफास लावून आत्महत्या करण्याऐवजी खिशात एखादा बॉम्ब टाकून मंत्र्याला मिट्टी मारून मरू अशा संताप यावेळी तरूण शेतकऱ्यांने व्यक्त केला आहे.

मुंबईच्या महागणपती येथे 5 जणांना विद्युत शॉक, एका मुलीचा मृत्यू

दक्षिण मुंबईतील काळाचौकीचा महागणपती मंडळाच्या परिसरात वीजेचा झटका लागून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री भाविक मोठ्याप्रमाणावर काळाचौकीचा महागणपतीच्या दर्शनाला आले होते. याठिकाणी वीजेचा झटका लागून पाच जण जखमी झाले. यामध्ये लहान मुलांचा आणि तरुणांचा समावेश आहे. वीजेचा झटका लागून जखमी झालेल्यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे सर्वजण 8 ते 20 या वयोगटातील आहेत. जखमींपैकी आठ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या तरूणाचा मृत्यू

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आलेल्या 25 वर्षीय तरुणाची अचानक प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री घडली. जयदीप मेघराज नेमाडे (वय 25) असे मृत भाविकाचे नाव आहे. तो पुण्यातील बावधन येथील रहिवासी होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com