Maharashtra Political Live Update : ZP अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; 12 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास

Political Breaking Live Headlines Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC विद्यार्थ्यांची बैठक झाली या बैठकीत 'भीमनवार राजीनामा द्या' अशी मोहीम चालवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला, यासह आजच्या दिवसभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

ZP अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी

लातूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी अंदाजे १२ लाख रुपये रोकड आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC विद्यार्थ्यांची बैठक, 'भीमनवार राजीनामा द्या' मोहीम चालवणार

छत्रपती संभाजीनगर, शहरात रविवारी येथे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासोबत MPSC विद्यार्थ्यांची एक बैठक झाली. या बैठकीला अनेक विद्यार्थी हजर होते. या बैठकीत अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांना 'भीमनवार राजीनामा द्या' या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

उल्हासनगरात विजेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ येथे विजेच्या धक्क्याने एका 26 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा करिता उभारण्यात आलेल्या पोलच्या संपर्कात आल्याने या तरूणीला वीजेचा धक्का लागल्याची माहिती आहे. करिष्मा मडवाणी असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com