Maharashtra News Live Update : मुंबईतील रिक्षा, काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा प्रवास महागला, एमएमआरटीए भाडेवाढीला मंजुरी

Marathi Breaking Live Headlines Updates: आज पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गुंज कार्यक्रम, राज्यातील राजकीय. प्रशासकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबईत रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा प्रवास महागला, एमएमआरटीए भाडेवाढीला मंजुरी

राज्याची राजधानी मुंबईतून एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यात रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. या प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिकचे भाडे मोजावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपया, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही भाडेवाढ 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

काँग्रेसच्या महिला नेत्यानं स्वागतावेळी राहुल गांधींच्या गळात घातली भगवी शाल

पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी हे पुणे विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांसह पक्षाचे विविध पदाधिकारीही उपस्थित होते. पण ते विमानतळावरून बाहेर पडताच काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करतानाच एका महिला पदाधिकाऱ्यानं राहुल गांधी यांच्या गळात भगवी शाल घातल्याचं दिसून येत आहे. याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

'महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनस्मृतीचा डाव...'; राहुल गांधींचा हल्लाबोल

पुण्यातील छात्रो की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनस्मृतीचा डाव असल्याचं विधान केलं. ते म्हणाले, मनुस्मृतीत ती महिला बालपणी वडिलांच्या वडिलांसाठी, तारुण्यात पतीसाठी आणि म्हातारपणी निधनानंतर मुलांसाठी जगते. तसेच महिलांनी कधीही स्वतंत्र असू नये असंही म्हटलं. मात्र, हे विचार लज्जास्पद असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटलांची हजेरी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी गृहमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हेही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या पुण्यातील कार्यक्रमाला हजेरील लावली आहे. राहुल गांधी यांच्याकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत, ते आगामी काळात सोडविण्याचे काम करतील, असा विश्वासही रोहित पाटील यांनी बोलून दाखवला.

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून राहुल गांधी कार्यक्रमस्थळी दाखल

राहुल गांधी ‘छात्रों को गूंज’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले आहेत. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. राहुल गांधी यांच्यासोबत खासदार छत्रपती शाहू महाराज, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आहेत.

काँग्रेसच्या ‘छात्रों को गूंज’ला भाजपच्या ‘युवा की आवाज’चे उत्तर

पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों को गूंज’ हा कार्यक्रम होत असताना भाजपप्रणित वंदे मातरम समितीच्या वतीने युवा की आवाज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमामुळे पुणे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सीईओपी परिसरात सभा, बैठका, रॅली काढण्यास बंदी

पुण्यात सीईओपीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएसयूआय यांच्यातील वादानंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठ परिसरातील राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी सीईओपी आणि संपूर्ण विद्यापीठ परिसरात कलम १६३ लागू करण्यात आले आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या परिसरात सभा, मोर्चा, बैठका घेण्यास मनाई करण्यात आली आहे. रॅली काढणे, घोषणाबाजी करणे, आंदोलने आणि फलक, बॅनरवर लावण्यावर २६ ऑगस्ट रात्री बारापर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे.

साखर शंभर रुपये पार जाणार! प्रकाश आंबेडकरांचं भाकीत

आपल्याकडे मुबलक साखरेचा साठा होता, उलट अतिरक्त साखर आपण निर्यात करायचो. पण केंद्रातील सरकारने फक्त कमावणे हा अजेंडा डोळ्यासमोर ठेवल्यामुळे आज ८० रुपये किलो असलेली साखर येत्या दहा-बारा दिवसांत शंभर रुपये किलो होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

नाशिकमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात ‘एल्गार महामोर्चा’ला मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजाच्यावतीने नाशिक शहरात ‘एल्गार महामोर्चा’ काढण्यात आला आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, नाशिक जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५९ जातींना सोबत घेत हा महामोर्चा आयोजित करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप होऊन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातीतील विविध घटकांच्या हक्कांवर परिणाम करणारा असल्याचा आरोप करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

मला भेट दिलेला धनुष्य माझ्याकडून कोणीही काढून घेणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे शिरपूरमध्ये विधान

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुषबाण चिन्हावरून सुनावणी सुरू असून सर्व राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. अशातच धुळ्याच्या शिरपूर येथे न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटनावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी आपल्या भाषणात मला भेट दिलेला धनुष्य माझ्याकडून कोणीही काढून घेणार नाही, असे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर उपस्थिनांच्या भुवल्या उंचावल्या आहेत.

शालेय पोषण आहाराच्या धान्यात किडे-कचरा; FDA कडून वाहनातील उर्वरित साठा जप्त

जुन्नर तालुक्यातील काळवाडी परिसरात शाळांना पुरवल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या कच्च्या धान्यात सोंडे किडे आणि काडी-कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रकार समोर येताच FDA ने घटनास्थळी धाव घेत वाहनातील उर्वरित संपूर्ण साठा जप्त केला असून, शाळांना गेलेला मालही परत मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूला पोलिओचा डोस दिला पाहिजे- सचिन खरात

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बीडमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य असलेल्या वाल्मीक कराडला माननीय वाल्मीक कराड असे म्हटले आणि त्याचबरोबर वाल्मीक कराड यांनी बौद्ध आणि सुशिक्षित समाजाला अनेक वेळा मदत केल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. मात्र बौद्ध समाजाने कोणाची मदत घेतलेली नाही समाज स्वाभिमानी आहे अशा वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते मेंदूला पोलिओचा डोस देण्याची गरज आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी म्हटले आहे.

साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही : प्रतापओहोळ, उपाध्यक्ष साखर महासंघ

देशामध्ये साखरेचे दर वाढल्याने सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहेत. तर अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मात्र कर्जबाजारी झालेल्या साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळेल असा विश्वास साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी व्यक्त केलाय.

सदावर्तेंच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक; माजलगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत केली कारवाईची मागणी

बीडमध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यावरून आता शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. बीडमधील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा आरोप करत माजलगाव शिवसेनेने थेट शहर पोलीस ठाणे गाठलं. सदावर्ते यांचं हे वक्तव्य निषेधार्ह असून, त्यातून शिवसैनिक आणि नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय. पत्रकार परिषदेची ध्वनिचित्रफीत, माध्यमांतील वृत्त आणि उपलब्ध पुरावे तपासून सदावर्तेंवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

टिटवाळ्यात बेकायदा बांधकाम प्रकरणात केडीएमसी सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी निलंबित

केडीएमसी क्षेत्रातील अप्रभागातील साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी टिटवाळा, मांडा, बल्याणी परिसरातील बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी ठरले. अखेर कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांनी साहाय्यक आयुक्त चौधरी यांना तडकाफडकी पालिका सेवेतून निलंबित केले. टिटवाळा मोहने बल्यानी वडवली मांडा परिसरातील बेकायदा बांधकामांना साहाय्यक आयुक्त चौधरी पाठिंबा देत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षापासून पालिका मुख्यालयात येत होत्या. भू माफिया अनधिकृत पणे घरे तयार करून नागरिकांची फसवणूक करीत होते. यासंदर्भात वारंवार तक्रार करण्यात येत होती. मात्र सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी भूमाफियांविरोधात कोणती कारवाई केली नाही. अनधिकृत बांधकामांवर कोणतीही प्रकारची कारवाई होत नसल्याने अखेर केडीएमसी आयुक्त अभिनव यांनी जयवंत चौधरी यांना निलंबित केले आहे.

अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता सरकार दरबारी हालचालीला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये तब्बल एक तासांपेक्षा अधिक चर्चा झाली.

Vijay Wadettiwar On BJP भाजपला सत्तेची मस्ती, पोलिसांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबतायत

कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉग्रेसन नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. भाजपला सत्तेची मस्ती आली असून पोलिसांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाही धक्काबुक्की किंवा शिवीगाळ केलेली नाही, पोलिसांनी मारहाण केल्याचा निदान एक तरी व्हिडिओ दाखवावा. असं बोलत त्यांनी हल्लाबोल केलाय.

Harihar Fort Closed हरिहर गडावर पर्यटकांना बंदी, वनविभागाचा महत्त्वापूर्ण निर्णय

नाशिकमधील प्रसिद्ध हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलीये...पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य वनविभागनं हा महत्त्वापूर्ण निर्णय घेतलाय. मुसळधार पावसामुळे गडावरील दगडी पायऱ्या अतिशय निसरड्या झाल्या असून दाट धुक्यामुळे चढाई करणेही धोकादायक बनलेय...तर श्रावण महिन्यामुळे वाढलेली गर्दी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी वनविभागानं प्रवेश बंदीचे आदेश दिलेय..

Congress Vs BJP काँग्रेस नेते जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला, काही विद्यार्थी जखमी असल्याची माहिती

काल रात्री कॉंग्रेस आणि ABVP त झालेल्या राड्यात काही विद्यार्थी जखमी झालेय. या विद्यार्थ्यांना पुण्याच्या संचेती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं असून, कॉंग्रेस नेते जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी हॉस्पीटलमध्ये दाखल झालेय...मारहाण झालेल्या युवकाची विश्वजीत कदम, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतलीये...

Mcdonalds Licence Suspended मॅकडोनाल्डवर FDA चा बडगा, परवाना निलंबित, मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी

महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या मोहिमेत एफडीएची राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे... अशात आता FDAनं मुंबईत मॅकडोनाल्डसह सात ठिकाणी परवाने निलंबित केले आहेत...स्वच्छता आणि मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.. तर छत्रपती संभाजीनगरमधील गायत्री हॉटेलमध्ये कुजलेले पनीर आणि काळे तेल आढळल्याने परवाना रद्द झाला असून, गुटखा प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे... या विशेष तपास मोहिमेमुळे अन्नपदार्थांमधील गैरप्रकारांना मोठा आळा बसणार आहे..

Mumbai News : मुंबई शहरात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; 'एमएमआरटीए'ची भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबई शहरात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार टॅक्सीचे किमान प्रवासभाडे 31 रुपयांवरून 33 रुपये, तर रिक्षाचे भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे. सरकारकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर 1 सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

Police Dogs : पोलिस दलातून निवृत्त झालेल्या श्वानांची जबाबदारी गृहविभाग उचलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

पोलिस दलात 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलिस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील. त्यांच्या भोजनाचा आणि इतर सांभाळाचा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे.

JP Nadda on Rahul Gandhi : जेपी नड्डा यांची राहुल गांधींच्या दिल्लीतील आंदोलनावर टीका

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पेलेट गन हल्ल्यातील पीडित साहिल लोहबाखची एफआयआर दाखल होईपर्यंत तळ ठोकून राहिले. याच मुद्द्यावरून भाजप नेते जेपी नड्डा यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठीही नाही आणि न्यायासाठीही नाही. हे काँग्रेस पक्षाची राजकीय निराशा आणि राहुल गांधी प्रसिद्धीची भुकलेले असल्याचे दाखवते, असा टोला जेपी नड्डा यांनी लगावला.

Mahendra Dalvi : 'राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, गणतीत पकडत नाही'; महेंद्र दळवींचा तटकरेंवर प्रहार

राज्यात महायुती भक्कम असली, तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील राजकीय वाद मिटण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला असून, महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीसह सुनील तटकरेंवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही," असा प्रहार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर केला आहे.

Mumbai News : भारताच्या परकीय गंगाजळीत 9.9 अब्ज डॉलरची वाढ

भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9.905 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, 14 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय गंगाजळी 716.907 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.

Amravati News : निवृत्त न्यायाधीशांच्या घराची 8 दिवस रेकी; 11 लाखांची चोरी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

अमरावतीच्या परतवाड्यातील सिव्हील लाईन परिसरात निवृत्त न्यायाधीशांच्या बंद घराची रेकी करून तब्बल 11 लाख 90 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. चोरीच्या आठ दिवस आधी आरोपींनी कट रचला होता. 80 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 210 सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करत स्थानिक गुन्हे शाखा आणि परतवाडा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या टोळीचा छडा लावला. आरोपींकडून 67.02 ग्रॅम सोन्याचे दागिने, 76 हजार 700 रुपये रोख, तीन वाहने आणि पाच मोबाइल, असा 11 लाख 22 हजार 686 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Latur Big News : लातूरमध्ये 2 हजार 134 कोटीचा महाघोटाळा; आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून

विविध 16 कंपन्याशी संगनमत करत लातूरच्या उदगीर येथील एकाने तब्बल 2 हजार 143 कोटी 79 लाख 43 हजार रुपयाचा आर्थिक आणि फसवणूक करत महाघोटाळा केलाचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी रात्री उशिरा उदगीर पोलिसात श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह सोहळा कंपन्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या तीन दिवसापासून उदगीर शहरात आयकर विभागाच्या विविध पथकाकडून चौकशी सुरू होती. या चौकशी अखेर हा आर्थिक घोटाळा समोर आला आहे.

Shivsena (UBT) : शिवसेना UBT पक्षाचं उद्या तिरंगा आंदोलन

शिवसेना UBT पक्षाचं उद्या तिरंगा आंदोलन होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मैदाने वाचवण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता हे तिरंगा आंदोलन होणारआहे.

Nashik News: अशोक खरातनंतर नाशिकमध्ये भोंदू विशाल खडांगळेला अटक

लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा करणारा नाशिकमधील भोंदू विशाल खडांगळेला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेकडून 77 हजार रुपये लुटले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशोक खरातनंतर नाशिकमध्ये भोंदूगिरीचा 12वा गुन्हा करण्यात आला आहे.

Pune: काँग्रेस आणि अभाविपमध्ये राडा, काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी

पुण्यात काँग्रेस आणि अभाविपमध्ये झालेल्या वादात काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून जखमींवर संचेती रुग्णालयात उपचार सुरु आहे. काँग्रेस नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

ABVP Congress clash: अभाविपच्या तक्रारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्यातील COEP महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि काँग्रेसच्या युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभाविपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Rahul Gandhi: पुण्यात आज आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएस मैदानावर राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊपर्यंत कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे. ८ ते १० हजार नागरिक अपेक्षित असून, किमान चार प्रवेशद्वार, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वयंसेवक, सीसीटीव्ही आणि आवश्यक एनओसी बंधनकारक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com