

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागात खळबळ उडाली आहे. सीबीआयने दगडखाण व्यवसायाशी निगडित जीएसटी आणि रॉयल्टी प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल 40 लाखांची लाच स्वीकारताना अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकांसह एका एजंटला अटक केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथील कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी कांदा आमच्या डोळ्यात वर्षातून दोनदा पाणी आणतो, आता त्याला चांगला भाव आहे. त्यामुळे, या कार्यक्रमात कांदा भेट मिळाला नाही. नाहीतर एका तरी कार्यक्रमात कांदा भेट मिळतो. कांदे भेट मिळाले असते तर घरी तरी नेले असते, अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली.
शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील ससून डॉक मच्छीमार बंदराची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. येत्या आठ दिवसांत मी मुख्यमंत्री आणि या खात्याच्या मंत्र्यांची वेळ घेईन आणि तुमच्यासोबत समक्ष चर्चा करू असा शब्दही पवारांनी मच्छिमारांना दिला.
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित अंतरवाली सराटीत शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यापूर्वी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित अंतरवाली सराटीमध्ये मनोज जारंगे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
शक्तिपीठ महामार्ग आणि साखरेच्या दरातील चढ-उतारावरून कोल्हापुरात पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध करत, कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर साखरेच्या चढ-उतारावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप करत, साखर तस्करीच्या शक्यतेवरही सवाल उपस्थित केले आहेत. राजू शेट्टींच्या या आरोपांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कुणबी प्रमाणपत्राची 8 महिने होऊनही पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने दोघा पालकांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले आहे. वैजापूर शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत पडताळणीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे.
अंतरवाली सराटी ग्रामस्थांकडून बेमुदत उपोषण आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. उपोषणासाठी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या लढ्यासाठी अंतरवाली सराटीसह गोदापट्ट्यातील 123 गावातील नागरिक सज्ज आहेत, असे आंतरवाली सराटी ग्रामस्थांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटीत येणार असल्याचा दावा सकल मराठा समाजाने केला.
जगाच्या नकाशावर आयटी हब, अशी ओळख असणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांची अक्षरशः वानवा आहे. अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खड्डे, रस्त्यांची दुर्दशा अन त्यातून होणाऱ्या अपघातांमुळं आयटी अभियंते पुरते हैराण झालेत. सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ काराभरामुळं गेल्या दीड वर्षात 37 निष्पापांचे जीव गेलेत. चाकण midcतील कंपन्यांनी सोडून जातो, म्हटल्यावर सरकार खडबडून जागं झालं. आता आम्ही हिंजवडीतून जाण्याची वाट सरकार पाहणार का? असा संतप्त सवाल उपस्थित करत या आयटी अभियंत्यांनी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे.
दिशा सालियान प्रकरणात शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अॅड. सुदीप पाचबोला यांनी बाजू मांडली. आदित्य ठाकरे यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वाचा आणि आक्रमक युक्तिवाद करण्यात आला. अॅड. पाचबोला यांनी म्हटले की, "दिशा सालियनच्या मृत्यूचे भांडवल करून राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी हे सर्व घडवून आणले आहे. त्यात राणे, त्यांची मुले आणि यांचा समावेश आहे," असा थेट आणि गंभीर आरोप आदित्य ठाकरेंचे वकील वरिष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी उच्च न्यायालयात केला.
लोकलच्या दरवाजामध्ये उभं राहण्यावरून झालेला किरकोळ वाद एका प्रवाशाच्या जीवावर बेतला असता. या वादातून एका युवकाने दुसऱ्या प्रवाशाला धावत्या लोकलमधून लाथ मारून बाहेर फेकल्याची घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात तौसिफ शेख (वय 24, रा. नालासोपारा) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी राहुलकुमार पांडे (वय 30) याला अटक केली आहे.
धावत्या मेल एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. दीपक चव्हाण आणि भोला चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे दोघे कैद झाले होते. त्यानंतर कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचचे पोलिस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, दोघेही कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली.
सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे अनेक नागरिक खासगी वाहनाचा वापर करतात. यासगळ्या गोष्टीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सने आपल्या भाड्यात दुपटीने वाढ केली. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. काही मार्गांवर नेहमीच्या भाड्यापेक्षा तब्बल 50 ते 100 टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम आकारली जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारण्यात येणाऱ्या या वाढीव भाड्याची प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.
चाकण–शिक्रापूर मार्गावर अवजड कंटेनरची मोठी रांग लागली आहे. या कोंडीचा फटका सणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसतोय. कंटेनरच्या गर्दीत प्रवासी वाहने अडकल्याने वाहतूक संथ झाली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या वाहतूक नियोजनावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
लाडक्या बहिणींचे १५०० ऐवजी ३ हजार रुपये करा, रक्षाबंधनानिमित्त आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे. 'वेळ पडल्यास आमदार-खासदारांचे पगार कमी करा, असही त्या म्हणाल्या. रवी राणांच्या कार्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.
जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा दिलाय... आता कुणाचं ऐकणार नाही वर्षावरच आंदोलन करणार... तर शिंदे फडणवीसांचं ऐकून मंत्र्यांनी मराठ्यांच्या लेकराबाळांचं वाटोळं करू नये असा इशाराही त्यांनी दिलाय...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता. २७) नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची मांदियाळी रंगणार आहे. दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे महात्मा गांधी विद्यामंदिर प्रसारक संस्थेच्या दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण, शिवनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, तसेच ठक्कर डोम येथे तीनदिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून उपोषणासाठी मंडप तयार करण्यात आला आहे.
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर आले आहे. ज्यामध्ये पेपर फोडण्यासाठी 50 लाख मोजल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असणाऱ्या सारोळा गावात एका तरुणावर दुसऱ्या एका तरुणाकडून चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित तरुण एक महिला आणि लहान मुलासह रस्त्याने जात असताना, दुसऱ्या एका तरुणाने अचानक मागून येत त्याच्यावर चाकूने सपासप वार केले यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रासह देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे बंधू तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्याबाबत एक भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी लिहिलं, 'प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा... पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं... यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील. तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे!'
पवित्र प्रणालीद्वारे राबवलेल्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना 13 हजार 119 उमेदवारांची निवड करण्यात आलीय. यात सर्वाधिक 8 हजार 481 उमेदवार हे जिल्हा परिषद शाळांसाठी निवडले आहेत.कागदपत्र पडताळणीनंतर या सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेतलं जाणार आहे.
प्रिय दादा,
आज राखीपौर्णिमा... पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं... यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील...
तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे
अशी भावूक पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऑटो-टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात व्यावहारिक मराठी आलीच पाहिजे, याला पूर्ण समर्थन असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी नमूद केले. तसेच व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देत, या कालावधीत यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले.
नेपाळमधील जलप्रयामुळे तब्बल 392 जणांचा मृ्त्यू झाला आहे. या प्रलयामुळे नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले तब्बल २८८ भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर, तिबेटमध्ये २०० जण अडकले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.