

विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खदखद व्यक्त करत सत्तेतील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचेही समर्थन केले. सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
दिल्लीमध्ये पाच सप्टेंबर रोजी एक शांततापूर्ण मोर्चा निघणार आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर जे आंदोलन झालं होतं, त्यानंतर 25 जुलै रोजी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती, ती आश्वासनं अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
परभणीत घेण्यात आलेल्या मेळाव्याची येत्या १२ तारखेला परतफेड केली जाणार आहे. परभणी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या होत्या. आम्ही परभणीत ताकद वाया घालवण्यापेक्षा मुंबईत घालवतो. बंडू जाधवचा बदला एकनाथ शिंदे यांना भोगायला लावणार. एकनाथ शिंदेंचाही तिथं कार्यक्रम होणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिला
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील आमदार खासदारांनी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. जालन्याचे काँग्रेसचे खासदार अमर काळे आणि बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.
नेपाळमध्ये आलेल्या महापुरात जलविद्युत प्रकल्पात काम करणारे ९०० जण अजूनही बेपत्ता आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. पण चिखल आणि मोठमोठ्या ढिगाऱ्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. बोगद्याच्या वरच्या भागात सध्या खोदकाम सुरू आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला यशवंत सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करत यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली. जालन्यातील वडीगोद्री ते अंतरवाली सराटीपर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. यावेळी अंतरवालीत उपोषण स्थळी मनोज जरांगे यांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला.
तरुणांनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना' आणि केंद्राच्या 'विश्वकर्मा योजने'चा लाभ घेऊन स्टार्टअप्स उभारावेत आणि नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी केले.
कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, "रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत २,१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू."
कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. 'जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६' च्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल २ हजार १५९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटींच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत शेतकरी व युवा मेळावा झाला. यावेळी भाषण सुरू होताच आंदोलक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावरून पोलिसांना करत शिंदे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेज वर आणा असे आदेश दिले.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रम पत्रिकेसोबत विषयांची सविस्तर टिपणी न दिल्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. यानंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर CCTV फुटेज हस्तगत करण्यासाठी संपूर्ण नगरपरिषद सील करण्यात आली आहे.
मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोंधळ झाला. मनोज जरांगे यांनी या मेळाव्याला कडाडून विरोध केला होता. घोषणाबाजीनंतरही शिंदेंनी आपले भाषण पुढे सुरूच ठेवले.
खासदार संजय जाधव यांनी परभणीत आयोजित केलेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदे दाखल झाले आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधानंतर मेळावा विनाअडथळा सुरू झाला आहे.
परभणीत खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा रद्द ने केल्यास तिथे जाण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी फोन केला. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत वन्यजीव निरीक्षणाचा आनंद घेतला. वनराईत मुक्तपणे वावरणारे प्राणी-पक्षी पाहताना मनाला प्रसन्नता मिळाली. या उद्यानाचा विकास आणि वन्यजीव संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. येथे रेस्क्यू सेंटरनंतर आता इंडियन सफारी सुरू झाली असून, पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. ‘बिग फाईव्ह’ प्राण्यांमुळे ही सफारी पर्यटकांसाठी निश्चितच मोठे आकर्षण ठरेल, असे फडणवीस म्हणाले.
ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये धावपटूंना मेडल न मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेली मुलांनी थेट ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पालकही आहे. त्यामुळे आयोजकांची तारांबळ उडाली.
समाजवादी पक्ष म्हणजे लूट आणि खंडणी, तसेच तो दरोडेखोरांची टोळी आहे, अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. राज्याच्या तिजोरीची लूट केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. देवरिया येथे 305 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 80 विकासकामांची पायाभरणी करताना योगी बोलत होते.
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी घुसून हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शरीफुल इस्लाम शेख याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरोपीने अर्जाद्वारे पश्चात्ताप व्यक्त करत शिक्षा कमी करण्याची विनंती केली. जानेवारी २०२५ मध्ये आरोपीने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर वार केले होते.
जरांगे पाटील यांनी परभणीतील एकनाथ शिंदे आणि बंडू जाधव यांचा मेळावा रद्द करण्याची मागणीवरून वाद झाल्यानंतर, मराठा आंदोलक कार्यक्रमस्थळी पोहोचले. तिथे जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत, मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांना फोन लावून केली. मात्र त्यानंतरही आपण कार्यक्रम घेणार असे संजय जाधव यांनी जाहीर केल्यानंतर परभणीत मराठा समाजातील तरुण आक्रमक झाले असून त्यांनी कार्यक्रमाच्या बाहेरच थेट घोषणाबाजी सुरू केली आहे. नांदेड विमानतळवर एकनाथ शिंदे येणार असल्याने मराठा तरुणांनी विमानतळावर मोठ्या संख्येने दाखल होत, एकनाथ शिंदेंच्या वापस जाण्याच्या घोषणा केल्या. जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर परभणीत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यक्रमस्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि बंडू जाधव यांनी आम्हाला आव्हान दिले आहे. आम्ही आव्हान स्वीकारले आहे. मुंबई आंदोलनात याची परतफेड करू. परभणी जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे तिथे जाऊन ताकद वाया घालवणार नाही. बंडू जाधवची आम्ही परतफेड करू. बंडू जाधवने मराठ्यांना खुन्नस दिली, त्याचा बदला आम्ही घेणार. बंडू जाधवची निवडणुकीमध्ये आम्हीच प्रतिष्ठा वाचवली होती, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
व्हेंटिलेटर कंपन्या सरकारला व्हेंटिलेटरवर आणत आहे. फायर ऑडिट वरून एकमेकांवर बोट दाखवत आहे. आम्हाला दोन मंत्र्यांचे भांडण पाहायचे नाही. मुख्यमंत्री यांनी या दोन्ही मंत्र्यांचे कान टोचावे, अशी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार सावंत यांनी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, संजय जाधवला मराठ्यांनी मोठा केला, तो आता शिरसाट, बावनकुळेंच्या टोळीत सामील झाला आहे. मी आत्ता परभणीला जाईल पण शिकार भेटणार नाही. पण मी बघतो त्यांना. बंडूने मोठी चूक केली. संजयच्या दुखाची दिवस सुरू झाली. परभणीत ताकद वाया घालवण्यापेक्षा मुंबईत ताकद दाखवू. शिंदेंनी रद्द करायचा ना कार्यक्रम.
परभणीतील मराठ्यांनी ताकद वाया घालवू नये, आपल्याला मुंबईला जायचे आहे. मुंबईसाठी ताकद राखून ठेवा, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.
मी बैलगाडी स्पर्धेतील बादशाह आहे. त्यामुळे कुठला बैल कधी बदलायचा हे मला चांगलं माहिती आहे. आगामी काळात बैल बदलून मीच रेस जिंकणार आहे, असे वक्तव्य एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी करत पुढील रणनीतीविषयी संकेत दिले. शिवसेनेचं बळ वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वरिष्ठांचा आदेश आला असता तर एक आमदार वाढला असता असेही आमदार दळवी यांनी म्हटले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सूचनानुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे.
सोलापूर महानगरपालिकेतील रिक्त पदांमुळे विकासकामे आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत असल्याने, शासनमान्य 130 पदांपैकी 127 पदे तातडीने भरण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला आहे.
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूरामुळे काठमांडू येथे अडकलेल्या नागपुरातील १०२ नागरिकांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्व नागरिक रविवारी पहाटे नागपूर येथे पोहचले आहेत.
अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांची खडतर सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांना शासकीय आणि निमशासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी विविध विभागांतील 'गट-क' संवर्गासह अन्य आस्थापनांमध्ये १ हजार पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध शासकीय यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात असल्याची माहिती आहे.प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ या धर्मगुरूंच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी भारताच्या धार्मिक परंपरेचा उल्लेख करताना भागवत यांनी सांगितले की, भारताने इतिहासात अनेक धर्म आणि पंथांच्या लोकांना आश्रय दिला आहे. परकीय आक्रमणांमुळे देशाने अनेक गोष्टी गमावल्या, मात्र भारताची परंपरा कायम राहिली. हीच परंपरा ‘एक जग, एक मानवता’ हा संदेश देते, असे मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील परिषदेत सांगितले.
पुण्यात आज पर्यावरण प्रेमी आणि डी जे विरोधात असलेल्या पुणेकरांचा पायी मोर्चा रद्द. गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि डी जे विरोधातील पुणेकरांची पार पडली बैठक.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी अल्पशा आजाराने झाले निधन झाले. विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि राज्याच्या शिक्षण धोरण प्रक्रियेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून सरकारने मागण्या मान्य न केल्यास येत्या १२ तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख आणि पुढील दिशा ठरवणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. तर दुसरीकडे सरकारकडून पुन्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीसाठी अंतरवाली सराटीत येणार असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.