Vidhan Parishad polls : कोकणात शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरेंचा मास्टरप्लॅन; 'या' विश्वासू शिलेदाराला मिळणार विधानपरिषदेची संधी?

Uddhav thackeray shivsena News : आगामी काळात विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणूक होत आहे. 12 मे रोजी मतदान होत आहे त्यामुळे या नऊ जागेसाठी सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच दिसत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणूक होत आहे. 12 मे रोजी मतदान होत आहे त्यामुळे या नऊ जागेसाठी सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच दिसत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता या नऊ जागांपैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. तर दोन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येत आहेत तर एक जागा अजित पवार यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येत आहे. तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येत आहे, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे सेनेला जागा सोडण्यास तयार आहेत. मात्र, ठाकरे लढणार नसतील तर या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. या जागेवर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर ठाकरे सेनेकडून इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. त्यामध्ये कोकणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रोखण्यासाठी ठाकरेंचा मास्टरप्लॅन तयार असून त्यांनी शिलेदाराला विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे.

Uddhav Thackeray
vidhanparishad Election: विधानपरिषदेसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच! नीलम गोऱ्हेंसह 'ही' नावे चर्चेत; कोणाची लागणार लॉटरी, कोणाचा पत्ता कट होणार?

येत्या काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तयार नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या जागेवर ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे. त्या जागेवर माजी विरोधी पक्षनेते एमबीदास दानवे यांच्या नवा आघाडीवर आहे. या जागेवर त्यांची वर्णी लागावी यासाठी ते ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याचे समजते.

Uddhav Thackeray
Vidhan parishad election : विधान परिषदेचे रण तापले! मविआमध्ये रस्सीखेच, उद्धव ठाकरेंसाठी पडद्याआड मोठ्या घडामोडी? काय सांगतोय गणिताचा हिशोब?

विधानपरिषदेच्या या जागेवर ठाकरे यांच्या शिवसेनेने धक्कातंत्राचा अवलंब केला तर प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे नाव पुढे येऊ शकते. राज्यसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक ज्योती वाघमारे यांना संधी दिली होती. त्याप्रमाणे आता ठाकरेंची शिवसेना देखील अंधारेंना उमेदवारी देत धक्कातंत्राचा अवलंब करू शकते, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, अंधारे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे समजते.

Uddhav Thackeray
Vidhan parishad election : विधान परिषदेचे रण तापले! मविआमध्ये रस्सीखेच, उद्धव ठाकरेंसाठी पडद्याआड मोठ्या घडामोडी? काय सांगतोय गणिताचा हिशोब?

त्यासोबतच ठाकरे सेनेचे युवा पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. सूरज चव्हाण हे खासदार संजय राऊत व आमदार वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे समजते. या बाबतचा अधिकृत निर्णय उद्धव ठाकरे हे घेणार असल्याने सध्या उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

Uddhav Thackeray
vidhanparishad Election: विधानपरिषदेसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच! नीलम गोऱ्हेंसह 'ही' नावे चर्चेत; कोणाची लागणार लॉटरी, कोणाचा पत्ता कट होणार?

कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, या गडात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे कोकणावर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेचा शिलेदार व माजी आमदार वैभव नाईक यांच्या नावाची जोरात चर्चा सुरु आहे. १५ वर्षांपूर्वी या ठिकाणी नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. त्यामुळे कोकणात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून वैभव नाईक यांचा मोठा दरारा आहे. त्यामुळे नाईक यांना विधानपरिषदेची संधी दिल्यास कोकणात पुन्हा ठाकरे यांच्या शिवसेनेला सोन्याचे दिवस येतील, अशी चर्चा सर्वसामान्य शिवसैनिकांत रंगली आहे.

Uddhav Thackeray
vidhanparishad Election: विधानपरिषदेसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच! नीलम गोऱ्हेंसह 'ही' नावे चर्चेत; कोणाची लागणार लॉटरी, कोणाचा पत्ता कट होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com