
Maharashtra Elections : गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निवडणुका नेमक्या कधी होणार याची मोठी माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथे राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टिने आढाव बैठक पार पाडली. या बैठकीत निवडणुका कधी होणार याची संकेत देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडील मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचा विचार करता एकाच टप्प्यात या निवडणूक घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम ऑक्टोबरमध्ये नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक देखील एकत्र घेणे शक्य नसल्याने डिसेंबर महिन्यास सर्व महापालिकांची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे. साधारण दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. नगर परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वाॅर्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करणे आदी कामांसाठी लागणार वेळ पाहात या निवडणुका चार महिन्यात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. त्यातही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा बार हा दिवाळीनंतरच उडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, वर्धा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भाजप महायुतीसोबत एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच जेथे एकमत होत नाही तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केला जाईल ते स्थानिक समीकरणावरून ठरवण्यात येईल, असे देखील फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.