Maharashtra Lok Sabha Election Result : राजसाहेब… ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’!  

Lok Sabha Election 2024 MNS Raj Thackeray NDA Vs India Alliance Maharashtra Result : महाराष्ट्रात एनडीएला मोठा फटका बसला असला तरी मनसेचे कार्यकर्त्यांना वेगळाच आनंद झाला आहे. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या मतदारसंघात एनडीएचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत.
Eknath Shinde Raj Thackeray Devendra Fadnavis
Eknath Shinde Raj Thackeray Devendra FadnavisSarkarnama

Mumbai News : उध्दव ठाकरेंच्या 4 डझन आमदारांना फितवून, एकनाथ शिंदेंना पुढे करून फडणवीसांनी सत्तांत्तर घडवून आणले. तरीही, ठाकरे हे भारीच ठरत असल्याचे फडणवीस आणि महाशक्तीने म्हणजे, अमित शहांनी राज ठाकरेंना सांगवा धाडून दिल्ली दरबारात बोलावून घेतले आणि ठाकरेंच्या तोफेला ठाकरी 'दारुगोळाच वापरण्याची चाल अमित शहांनी खेळली. पण, शिंदे, फडणवीस, अजितदादा, शेवटी राज ठाकरे ही मंडळी एकत्र येऊनही महाराष्ट्रात ठाकरे-पवारांचा जलवा राहिला. तरीही राजसमर्थक वृत्तवाहिन्यांवर आपली पाठ थोपटून घेत आहेत. हा प्रकार म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' असेच म्हणावे लागणार आहे.

दिल्लीतील 'महाशक्ती' च्या धाकाने शिंदे आणि ठाकरेंच्या फुटीर आमदारांनी हिंदुत्वासाठी उचल खाल्ल्याचे अर्थात, बंड पुकारल्याचे जाहीर करून टाकले. 'सीएम' पदाची खुर्ची गेली, शिवसेनेचे नाव, पक्ष चिन्ह हिसकावले गेले, उरलेसुरले 13 खासदारही नेले. मात्र, या निवडणुकीत उमेदवार देण्यापासून प्रचारसभा घेणे आणि प्रचारसभा घेऊन त्याचे निकालात परिवर्तन करण्यापर्यंत ठाकरे-पवारांची ताकद दिसून आली. ती पाहून शिंदे, फडणवीस-अजितदादांना दिवसा तारे दिसले असावेत.

भाजपाला फायदा व्हावा म्हणून राज ठाकरेंनी मोजक्याच पण दणदणीत सभा घेतल्या. या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे मतमोजणीतून दिसून आले. राजसाहेबांनी जिथे कुठे सभा घेतल्या; त्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आघाडी घेतल्याचे जाहीर करीत, राजसमर्थकांनी आपली पाठ थोपटून घेत आहेत.

या निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार नसतानाही राज यांची प्रचंड कष्ट उपसले. विरोधी नेत्यांवर जोरदार प्रहार केले. त्यामुळे प्रचाराच्या काळात सत्ताधाऱ्यांना बळ आले; पण निकालाचे आकडे पाहून कोणाचा किती फायदा झाला हे, या साक्षात्काराने फडणवीस आणि नेतृत्वाचे डोळे उघडले असावेत. परंतु, राजसाहेबांच्या सभांचा मनसे कार्यकर्ते आता उदोउदो करीत आहेत.

या निवडणुकीत उध्दव ठाकरे जड जाणार हे माहिती असल्यानेच राज ठाकरेंना महायुतीत ओढण्यात आले. राजसाहेबांनीही ठाकरी शैलीत हुंकार भरत विरोधकांना जेरीस आणले. त्यांनी सभा घेतलेल्या मतदारंसघात महायुतीच्या उमेदवारांनी आघाडीही घेतल्याने राजसाहेबांचे महत्व महायुतीमध्ये वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com