Lok Sabha Election 2024 Result : मोठा दणका! 20 खासदारांना बसवलं घरी, भाजपचे 12 जण, शिंदे गटाचे किती?

Sitting MP defeated Raosaheb Danve Sujay Vikhe-Patil : रामटेक मतदारसंघात विद्यमान खासदाराला डावलून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, काँग्रेस उमेदवाराने त्यांचा पराभव केला.
Sitting MP defeated Raosaheb Danve Sujay Vikhe-Patil
Sitting MP defeated Raosaheb Danve Sujay Vikhe-PatilSarkarnama

Ramtek Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विद्यमान खासदारांमध्ये तब्बल 20 जणांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या 20 खासदारांमध्ये 12 जण भाजपचे आहे. भाजपच्या विद्यमान 3 केंद्रीय मंत्र्यांचा देखील पराभव झाला.

भाजपने आणि शिंदे गटाने काही ठिकाणी विद्यमान खासदारांना तिकीट नाकारत तेथे उमेदवार बदलले मात्र त्याचा ही फायदा झालेला नाही. प्रतिम मुंडे यांना तिकीट नाकारून त्यांची बहिण पंकजा मुंडे यांना दिले मात्र त्यांचा पराभव झाला. तर, यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी यांनी शिंदे गटाने तिकीट न देता अर्चना पाटील यांना दिले. मात्र, त्यांचाही पराभव झाला.

रामटेक मतदारसंघात विद्यमान खासदाराला डावलून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, काँग्रेस उमेदवाराने त्यांचा पराभव केला. तर पूनम महाजन यांना तिकीट न देता भाजपने उज्वल निकम यांना दिले. मात्र, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला.

पराभूत विद्यमान खासदार

- भाजपचे रावसाहेब दानवे (भाजप)

- हेमंत गोडसे (शिवसेना, शिंदे गट)

-राहुल शेवाळे (शिवसेना, शिंदे गट)

- सदाशिव लोखंडे (शिवसेना, शिंदे गट)

- हिना गावित (भाजप)

- सुभाष भामरे (भाजप)

- नवनीत राणा (अपक्ष)

- कपिल पाटील (भाजप)

- भारती पवार (भाजप)

- रामदास तडस (भाजप)

-सुजय विखे पाटील (भाजप)

-संजयकाका पाटील (भाजप)

- राजन विचारे (शिवसेना, ठाकरे गट)

- संजय मंडलिक (शिवसेना, शिंदे गट)

- प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)

- अशोक नेते (भाजप)

- सुनील मेंढे (भाजप)

- रामदास तडस (भाजप)

- इम्तियाझ जलील (एमआयएम)

-विनायक राऊत (शिवसेना, ठाकरे गट)

Sitting MP defeated Raosaheb Danve Sujay Vikhe-Patil
Nitish Kumar and Tejashwi Yadav On Same Flight : नितीश कुमार अन् तेजस्वी यादव करणार खेळ? दिल्लीचं राजकारण हादरणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com