PM Modi : संघ मुख्यालयात भाजप प्रचारासाठी पहिले योगी, नंतर मोदी !

Nagpur Rally : संपुर्ण देशभरात पन्नास लाख कोटींचे विकास कामे करत क्रमांक एकचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे.
PM Modi : संघ मुख्यालयात भाजप प्रचारासाठी पहिले योगी, नंतर मोदी !
Published on
Updated on

Nagpur Loksabha Election 2024 : रस्ते, बंदरे आणि इतर विकास कामात अग्रेसर असलेले केंद्रातील सर्वात महत्वाचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपुर दौरा निश्चित झाला आहे. पंतप्रधान एका जाहिर सभेला येथे संबोधित करत लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी अच्छे दिन आणतील. या प्रचार सभेतुन पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात काय संदेश देतात हे पाहण्यासारखे असेल. नागपुर येथे होणाऱ्या या सभेसाठी महायुतीने तयारी सुरु केली आहे. नियोजन अंतिम टप्प्यात आहे. संघ मुख्यालयात भाजप प्रचारासाठी पहिले योगी आणि नंतर मोदी यांच्या सभा महत्वाच्या ठरणार आहे.

प्रचारासाठी अवघे काही दिवस हाती असताना आज रविवारचा सुटीचा दिवसाचा योग्य उपयोग भाजप, काँग्रेस नेत्यांनी केला आहे. येत्या आठवड्यात प्रचाराचा मतदारसंघात भडका उडणार असल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. सोबतच रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्याही प्रचारसभेत मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. गडकरी यांनी दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचार यात्रा निघणार आहे. भाजपसह महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला होता. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi : संघ मुख्यालयात भाजप प्रचारासाठी पहिले योगी, नंतर मोदी !
Eknath Khadse News : स्वगृही परतण्यासाठी नाथाभाऊंना भाजपने घातल्या अटी; आमदारकी अन्...

चंद्रशेखर बावनकुळे स्वतः मैदानात उतरणार आहेत. जिल्ह्यात भाजपचे नेटवर्क आहे. शिवसैनिकांची संख्या मर्यादित असल्याने भाजपने प्रचाराची सूत्रे आपल्या हाती आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला आणि काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांच्या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते. आज विकास ठाकरे यांच्या दोन प्रचार यात्रा निघाल्या. विकास ठाकरे यांना वंचित ने निवडणुकीत पाठिंबा दिला असुन काँग्रेस तर्फे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांना नागपुर येथे आंमत्रित केले जाते हे का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. वंचितने येथे उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस ने अकोल्यात वंचित विरोधात उमेदवार उभा केला होता.

उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे शिवसेनेत सहभागी झाल्याने नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसमुक्त झाला आहे. आजघडीला रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार शिल्लक राहिलेला नाही. भाजपचे स्वप्न शिवसेनेने पूर्ण करून दाखवले. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पदार्पण केल्यानंतर भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. मात्र सावनेर विधानसभा मतदारसंघात सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्याला काँग्रेसमुक्त होऊ दिले नव्हते.

पण सुनील केदार यांचे बँक घोटाळा प्रकरणात आमदारकी रद्द झाली. उमरेडमधून काँग्रेसचे राजू पारवे निवडून आले होते. त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. पारवेंच्या सोडचिठ्ठीने का होईना रामटेक लोकसभा मतदारसंघ तात्पुरता काँग्रेसमुक्त झाला आहे. लोकसभा मतदारसंघाचा विचार करता दहा वर्षांपासून नागपूर जिल्हा काँग्रेसमुक्त आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत. गडकरी तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे रामटेक कॉंग्रेसमुक्त ठेवण्याची जबाबदारी आता राजू पारवे यांच्यावर आली आहे.

नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी सोमवारी (ता. ८) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नागपूरला येत आहेत. पश्चिम नागपूरमध्ये हिंदी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची सभा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ठेवण्यात आली आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कन्हान येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने केली जात आहे. कन्हान पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या पटांगणावर सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा बिगुल खुद्द मोदी फुंकणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

PM Modi : संघ मुख्यालयात भाजप प्रचारासाठी पहिले योगी, नंतर मोदी !
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींच्या पराभवासाठी भाजप नव्हे तर मित्रपक्षच उतावीळ; वायनाडमध्ये बसणार धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com