Kerala News : काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 नंतर यावेळीही केरळातील वायनाड हा लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघ निवडला आहे. मागील निवडणुकीत त्यांचा अमेठीतून पराभव झाला तर वायनाडमध्ये विजय मिळाला. यावेळी ते अमेठीतून लढणार की नाही, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्यासाठी वायनाड हे सुरक्षित मानला जात असला तरी यावेळी भाजपने नव्हे तर इंडिया आघाडीतील त्यांच्याच मित्रपक्षाने आव्हाने उभे केले आहे.
वायनाडमध्ये राहुल (Rahul Gandhi) यांच्या विरोधा भाजपसह कम्युनिस्ट पक्षाने उमेदवार उतरवला आहे. सीपीआयने (CPI) महासचिव डी. राजा यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेत्या एनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून (BJP) प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन रिंगणात आहेत. त्यामुळे राहुल गांधींसाठी ही लढाई सोपी राहिली नाही.
सीपीआय इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) आहे. इतर काही राज्यांमध्ये एकत्रित लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पण केरळमध्ये काँग्रेस (Congress) आणि सीपीआय कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे एनी राजा (Annie Raja) यांना उमेदवारी देत सीपीआयने राहुल यांच्या अडचणी वाढवल्याचे मानले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सीपीआयने यावेळी ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याची चर्चा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे बडे नेते सातत्याने वायनाडचा दौरा करत आहेत. इतर मुद्द्यांवरून राहुल आणि काँग्रेसला घेरले जात आहे. राहुल यांनी प्रचारसभांमध्ये अद्याप सीएएच्या मुद्यावर भाष्य केलेले नाही. त्यावरूनही इंडिया आघाडीत असलेल्या सीपीआयमध्ये नाराजी आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वायनाडमध्ये (Waynad Constituency) मुस्लिम मतदारांच्या समर्थनाशिवाय विजय अशक्य असल्याचे मानले जाते. त्यामुळेच केरळमध्ये डाव्यांची सत्ता असलेले सरकार सतत सीएएला विरोध करत असते. त्याचा फटका भाजपऐवजी राज्यात काँग्रेसला बसत आहे. त्यामुळे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. सीएएचे समर्थन केल्यास केरळमधील हिंदूंची मेत दूर जाण्याची भीता काँग्रेसला असल्याची चर्चा आहे. तर सीएएचा विरोध न केल्यास मुस्लिम मते विभागू शकतात, या द्विधा मनस्थितीत काँग्रेस आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या रॅलीमध्ये मित्रपक्ष असलेल्या इंडियन यूनियन लीगचे झेंडे दिसले नाहीत. त्यावरूनही डाव्या पक्षांसह भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधला. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये काँग्रेसचे झेंडेही नव्हते. संपूर्ण रोड शोमध्ये तिरंगा फडकत होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.