

Maharashtra Dynastic Politics: राज्यातील २९ महापालिकांची एकाच वेळी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीचे निकालही जाहीर झाले असून भाजपनं जवळपास २४ महापालिकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्या घरातच तिकीटं वाटली गेली. पण जनतेनं ही घराणेशाही नाकारली असून सामान्य कार्यकर्त्यांनाच बळ दिल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं ज्या नेत्यांच्या कुटुंबातील मंडळी पराभूत झाली आहेत, त्याचा आढावा घेऊयात.
राज्यात सर्वच महानगरपालिकांमध्ये विविध राजकीय पक्षांनी आपले आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबांमध्ये तिकीटं वाटली होती. हे सर्वजण विद्यमान लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांचा प्रभाव पडून त्यांचे कुटुंबिय देखील महापालिकेत निवडून जातील आणि पक्षाच्या उमेदवारांचा आकडा वाढेल अशी या पक्षांची आशा होती. पण त्यांची आशा सर्वसामान्य मतदारांनी धुळीस मिळवल्याचं दिसून आलं. कारण जवळपास १० असे नेत्यांच्या कुटुंबातून येणारे उमेदवार आहेत. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
प्रतिभा धंगेकर (शिंदे सेना) - रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी. पुण्याच्या 'प्रभाग क्र. २३-ब' मधून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांच्याकडून पराभूत.
कप्तान मलिक (राष्ट्रवादी) - नवाब मलिक यांचे बंधू. कुर्ला पश्चिम प्रभाग क्र. १६५ पराभूत.
विवेक कलोती (भाजप) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ. अमरावती महापालिकेत पराभूत.
दिप्ती वाईयकर (शिंदे सेना) - रविंद्र वायकर यांच्या कन्या. ठाकरेंच्या लोना रावत यांच्याकडून पराभूत.
समाधान सरवणकर (शिंदे सेना) - शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र. दादर प्रभाग क्र. १९४ मधून ठाकरे सेनेच्या उमेदवाराकडून पराभूत.
वैशाली शेवाळे (शिंदे सेना) - शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळेंच्या वहिनी. मुंबईच्या प्रभाग क्र. १८४ मधून काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांच्याकडून पराभूत.
नंदिनी विचारे (ठाकरे सेना) - शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी. ठाण्यात भाजपच्या काजल गुणीजन यांच्याकडून पराभूत.
राजेंद्र दानवे (ठाकरे सेना) - ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंचे बंधू. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग १६ ड मधून शिंदे सेनेच्या मनोज बल्लाळ यांच्याकडून पराभूत.
योगिता गवळी (अखिल भारतीय सेना) - डॉन अरुण गवळी यांची मुलगी. मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत.
त्याचबरोबर काही नेत्यांच्या कुटुंबियांनी या निवडणुकीत विजयही मिळवला आहे. यामध्ये काही मोजकीच नावं आहेत.
हर्षदा शिरसाट (शिंदे सेना) - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची कन्या. संभाजीनगर प्रभाग क्र. १८ मधून विजयी.
सिद्धार्थ शिरसाट (शिंदे सेना) - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र. प्रभाग क्रमांक २९ मधून विजयी.
भास्कर दानवे (भाजप) - माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू. जालन्यातील प्रभाग क्र. १ मधून विजयी.
तेजस्वी घोसाळकर (भाजप) - ठाकरे सेनेचे विनोद घोसाळकर यांच्या सून. दहिसरमधून भाजपचे उमेदवार म्हणून विजयी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.