Maharashtra Live Politics Update : नंदुरबार जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ८ मुलांना विषबाधा, एकाचा मृत्यू

Political Breaking Live Headlines Updates : एकाच कुटुंबातील ८ मुलांना विषबाधा, एकाचा मृत्यू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू, सिंहगड शिक्षण संस्थेची CBI आणि ED मार्फत चौकशी होणार यासह महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

भाजप आमदार परिणय फुकेंच्या मुलाचा अपघात, एकाचा मृत्यू: काँग्रेसचा गंभीर आरोप

काँग्रेस प्रदेध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळच्या पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त गाडी भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. एका तरुणाचा जीव गेला आहे, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा किंवा राजकीय दबावातून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आमदाराचा मुलगा म्हणून कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे!

नंदुरबार जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ८ मुलांना विषबाधा, एकाचा मृत्यू

नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील मोडलगावमध्ये एकाच कुटंबातील आठ मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. शेताच्या बांधावर खेळताना नकळत एरंडीच्या बिया खाल्ल्याने आठ चिमुकल्यांना गंभीर अन्न विषबाधा झाली. विषबाधेत चार वर्षांच्या एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.