Maharashtra Live Political Update : शरद पवार उद्यापासून पुन्हा सक्रिय होणार; पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमाला हजेरी लावणार

Political Breaking Live Headlines Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार उपचारानंतर पुन्हा एकदा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होणार आहेत. उद्या ते पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यासह विविध राजकीय घडामोडी पाहूया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

पुणे महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवत सव्वा कोटींची फसवणूक

पुणे महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत एका भामट्याने बेरोजगार तरुणांकडून तब्बल एक कोटी ३७ लाख ४४ हजार रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे, तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने पुणे महापालिकेत आपली ओळख असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याचा बनाव करून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महापालिकेचे शिक्के वापरून अधिकृत असल्याचे भासणाऱ्या लेटरपॅडवर बनावट नियुक्तीपत्रे तयार केली आणि ती बेरोजगार तरुणांना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्य सरकारकडून आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित

राज्य सरकारने राज्यातील आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. राज्यात यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या 304 दुष्काळी तालुक्यांव्यतिरिक्त, नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

शरद पवार उपचारानंतर पुन्हा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार उपचारानंतर पुन्हा एकदा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होणार आहेत. उद्या (शनिवारी) ते पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे आयोजित राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे तिन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.