Crime News : मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याची फसवणूक, लग्नासाठी मुलगा पाहिला अन् 18 लाख गमावले!

Woman Officer Police : लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदणी केली होती. तेथून एका जणाने त्यांचीशी संपर्क साधत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आणि पुढे त्यांची आर्थिक फसवणूक केली.
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : लग्नासाठी मुलगा शोधत असलेल्या मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याची तब्बल 18 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लग्नासाठी मुलगा शोधण्यासाठी या महिला अधिकाऱ्याने 'शादी डाॅट काॅम'वर नाव नोंदणी केली. लग्नासाठी इच्छुक असलेल्या दोन जणांनी त्यांच्याशी संपर्क साधून तब्बल 17 लाख 97 हजार रुपयांचा गंडा घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, नीता (नाव बदललेले आहे) या मंत्रालयात एका विभागत अधिकारी म्हणून काम करतात. लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदणी केली होती. तेथून एका जणाने त्यांचीशी संपर्क साधत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्याने नीता यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठवण्यास सांगितले. तसेच तो कॅनडाचा रहिवाशी असल्याची बतावणी केली. त्याच्या भूलथापांना बळी पडून नीता यांनी त्याला पैसे पाठवले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दिली.

Pune Crime News
Nashik Crime News : माजी विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; व्हिडीओ अन् चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत 5 लाखांची मागणी

कंत्राटदाराचा टोकाचा निर्णय

अमरावतीच्या जरूडमध्ये शासकीय कंत्राटदार सुनील वागद्रे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासनाकडून तब्बल अडीच कोटी रुपयांची देयकं थकल्यामुळे ते कर्जबाजारी झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप शासकीय कंत्राटदार संघटनेने केला आहे.

Pune Crime News
Satara Crime : शिक्षक पित्याने रागाच्या भरात पोटच्या मुलीला संपवलं; साताऱ्यात टीव्ही-मोबाईलचा वाद जीवावर बेतला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com