Maharashtra MLC election : विधानपरिषदेत महायुतीने काढला 'वचपा'! गेल्या निवडणुकीतील पराभवाचा बदला घेत उधळला दोन जागांवर गुलाल; तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गड राखले

Mlc election result News : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा वरचष्मा राहतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
Amravati Teacher MLC Election | Mahayuti and MVA
Amravati Teacher MLC Election | Mahayuti and MVASarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणी पार पडली. महायुती आणि महाविकास आघाडीत सरळ लढत होत असल्याने या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. 2020 साली झालेल्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता. त्यामुळे महायुतीला खाते खोलता आले नव्हते. त्यामुळे यावेळेस महायुतीने दोन जागा पटकावत गेल्या वेळेस झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा जिंकत गड शाबुत ठेवला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट पाहवयास मिळत असून अद्याप 10 हजार मतांची मोजणी बाकी असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. याठिकाणचा निकाल जाहीर होण्यास उशीर लागणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा वरचष्मा राहतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र, या निकालानंतर महायुतीला 2 आणि महाविकास आघाडीला 2 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत दोन विद्यमान आमदारासह दोन माजी आमदाराचा पराभव झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयंत आसगावकर आणि दत्तात्रय सावंत हे दोघे माजी शिक्षक आमदार उभे होते. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. पण या निवडणुकीत जयंत आसगावकर यांचा पराभव झाला आहे. आसगावकर हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 8 हजार 620 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे 17 हजार 948 मतांनी आघाडीवर आहेत. आजगावकर यांच्यासाठी हा पराभव अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.

2020 साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना विधानपरिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळेस महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. पाच पैकी चार जागा आघाडीने जिंकल्या होत्या. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर विजयी झाले होते. तर छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टर्म असलेले सतीश चव्हाण विजयी झाले होते तर पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड विजयी झाले होते. त्यामुळे आघाडीचे चार आमदार विजयी झाले होते तर अमरावती पदवीधरमध्ये पक्ष सरनाईक विजयी झाले होते. त्यामुळे आघाडी चार तर अपक्ष उमेदवार एक जागी विजयी झाला होता. तर महायुतीला खाते खोलता आले नव्हते.

त्यानंतर शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेमधील फुटीमुळे नेतेमंडळी महायुतीसोबत गेले. त्यावेळी आमदार सतीश चव्हाण, किरण सरनाईक महायुतीसोबत गेले. मात्र, या निवडणुकीत महायुतीला 2 आणि महाविकास आघाडीला 2 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत 2 विद्यमान आमदारासह दोन माजी आमदाराचा पराभव झाला. त्यामध्ये जयंत आसगावकर, सतीश चव्हाण विद्यमान आमदार पराभूत झाले.

नागपूर पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट पाहवयास मिळत असून काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी 4 हजार 700 मतांचे लीड तोडले आहे. भाजपच्या सुधाकर कोहळेंवरती त्यांनी 2400 मतांची आघाडी घेतली असून अद्याप 10 हजार मतांची मोजणी बाकी असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. याठिकाणचा निकाल जाहीर होण्यास उशीर लागणार आहे.

या निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव पाटील विजयी झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा जाधव-देशमुख विजयी झाल्या तर अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक हे विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com