Maharashtra Politics Live : कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांना आंदोलनातून हुसकवलं

Maharashtra Monsoon Session 2025 News update: महाराष्ट्रातील राजकीय व प्रशासकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर
MNS District President Avinash Jadhav arrested before protest march
MNS District President Avinash Jadhav arrested before protest marchSarkarnama
Published on
Updated on

अविनाश जाधवांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडलं

मराठी अस्मिता मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या अविनाश जाधव यांच्यासह स्थानबद्ध मोर्चेकरांना पोलिसांना सोडून देण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांना आंदोलनातून हुसकवलं

आंदोलनात सहभागी झालेल्या मंत्री प्रताप सरनाईक यांना मोर्चेकरांनी जय गुजरात आणि 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत डिवचलं. तसंच त्यांना हुसकावून लावलं. त्यामुळे सरनाईक यांना आल्या पावली माघारी परतावं लागलं.

Pratap Sarnaik : पोलिसांना आव्हान दिल्यानंतर प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अखेर मिरा भाईंदर येथील मोर्चात सहभागी झाले आहेत.

Mira Bhayandar Protest : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघाला

मीरा भाईंदर इथे मनसेसह मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र, या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मात्र, कार्यकर्ते मोर्चावर ठाम राहिल्यामुळे पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाला परवानही दिली आहे. त्यामुळे हा मराठी आंदोलकांच्या एकीचा विजय झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, बालाजी हॉटेल सर्कल, मिरा रोड ते मीरा रोड स्टेशन असा मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे.

Pratap Sarnaik : हिम्मत असेल तर अडवा - प्रताप सरनाईक

मीरा भाईंदर इथे मनसेसह मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र, या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी मी स्वत: मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघतोय, हिम्मत असेल तर अडवा, असं आव्हान पोलिसांना दिलं आहे. ते म्हणाले, काल मराठी एकीकरण समितीचे नेत्यांना परवानगी नाकारली. काही लोकांना तडीपारीच्या नोटीस दिल्या आहेत. याबाबत मी पोलिस आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्या भागाचा आमदार म्हणून मी हे सहन करणार नाही. मी मोर्चामध्ये सामील व्हायला निघालो आहे मला पोलिसांनी अडवून दाखवावं असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Sandeep Deshpande On Devendra Fadnavis : घटना मीरारोडला अन् घोडबंदरला मोर्चा काढण्यासाठी परवानगी 

मराठी भाषेच्या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसेने मोर्चाचं आयोजन केलं होतं. बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानही नाकारली. तरीही मनसेने मोर्चा काढण्याची ठाम भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला परवानगी का नाकारली याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, पोलिसांची मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्याबाबतची चर्चा सुरु होती. मात्र, मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल, अशा मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागत असल्यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. मात्र, सरकारला मोर्चाला परवानगी द्यायचीच नव्हती. घटना मीरारोडला घडली आणि ते घोडबंदरला मोर्चा काढण्यासाठी परवानगी देत होते, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com