

PADU machine : राज्यात महापालिका निवडणुकांसाठी अवघ्या काही तासांवर मतदान आलं आहे. यातच राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनबरोबर, PADU नावाचं नवीन मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेपुरता सध्या हा प्रयोग असणार आहे. आयुक्त भूषण गगराणी यांनी या मशीनची माहिती दिली असून, ही PADU मशीनचं प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट, असं तिचं संपूर्ण नाव आहे.
या PADU मशीनवर राज ठाकरेंसह विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने एवढा मोठा निर्णय घेताना राजकीय पक्षांना त्याची पूर्वकल्पना का दिली नाही? यामागे नेमकं कारण काय आहे? मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, प्रशासनाकडून PADU मशीनचा वापर सांगण्यात येत आहे, यावर राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी PADU या मशीनवरून प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांमध्ये त्यांचा अधिक संताप दिसत होता. राज ठाकरेंनी राज्य निवडणूक आयोगाला (Election Commission) सवाल करताना, काल पाच वाजता प्रचार संपला, तरी काहींचा प्रचार सुरूच आहे. त्यांना मुभा आहे का? आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली? मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याचे अधिसूचना आज का काढली? असे प्रश्न केले.
प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात PADU नावाचे नवे मशीन का जोडताय? PADU नावाच्या मशीनबद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही? सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का? असे प्रश्न करत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गंभीर आरोप केले.
काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील निवडणूक आयोगाने या मशीनबाबत घेतलेल्या परस्पर निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,"निवडणूक आयोगाने या यंत्रणाची माहिती जनतेला द्यायला हवी होती. महापालिका निवडणुकीमध्ये या यंत्रणाचा वापर करत असल्याने, त्याची राजकीय पक्षांना माहिती नको का? यंत्रामध्ये नेमकं काय आहे? याची माहिती नको."
'केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी न घेता, हे मशीन बसवण्याचा वाघमारेंना कोणी अधिकार दिला? वाघमारे हे सरकारचे नोकर आहेत का? निवडणूक आयोग स्वायत्त यंत्रणा आहे, तसे तिला अधिकार आहेत. असे असताना या यंत्रणेने राजकीय पक्षांबरोबर बैठक घेऊन, त्या यंत्रणेबाबत माहिती देण्याची आवश्यकता होती,' असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
'हे यंत्र बसवले जात असेल, तर तिचा वापर मत चोरीसाठी होत आहे की, विरोधकांना संपवण्यासाठी? विरोधकांनी मतं फिरवण्यासाठी होणार आहे की अन्य काय आहे? याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आहोत. या यंत्राबाबत खुलासा होईपर्यंत त्याचा वापर करू नका, अशी आमची भूमिका राहणार आहे,' असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोग हा सरकारचा गुलाम झाला आहे. लोकशाहीचं एवढं अधिपतन होताना आम्ही कधी पाहिलं नाही. निवडणूक आयोगाची पत घसरेल, असे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. भाजप कोणत्या स्तराला निवडणुका घेऊन जात आहे, हे दिसतं आहे. राज ठाकरे यांनी यावर जोरदार खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील आक्षेप घेणारे पत्र पाठवले आहे. काँग्रेस देखील पत्र पाठवून विचारणा करत खुलासा मागवू, यातून समाधान न झाल्यास यंत्राविरोधात, निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक आंदोलन करू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.