Pawar NCP unity : राष्ट्रवादीच्या एकीवर पडदा? विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘पवारांना ओळखण्याची 'पॉवर'..!’

Vijay Wadettiwar Comments on Sharad–Ajit Pawar NCP Unity : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, अजित पवार यांच्या विधानावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Pawar NCP unity
Pawar NCP unitySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. महापालिका निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सुरवात झाली आहे.

यावर महापालिकेच्या मतदानाला एक दिवस राहिला असताना, पुन्हा चर्चांना जोर पकडला आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'त्यांच्या मनात आणि पोटात काय आहे, हे आम्हाला कसे कळेल? तसेही पवार जे बोलतात, ते ओळखण्याची पॉवर आमच्यात नाही,' असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी (Municipal Election) उद्या मतदान होत आहे, त्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. राज्यात सत्ताधारी महायुतीमध्ये महापालिकांची सत्ता काबीज करण्याची सर्वाधिक स्पर्धा आहे. त्यामुळे महायुती फिस्कटल्याचे दिसते. एकमेकांविरोधात लढताना काही ठिकाणी युती झालेली दिसते, तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी मित्र पक्षांना बाजूला सारून विरोधकांना एकत्र घेतले आहे. त्यामुळे नेमकं कोण कोणाविरोधात हेच राज्यात कळायला मार्ग नाही.

यातच दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना आता अजित पवार यांच्याकडून ब्रेक दिला गेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pawar NCP unity
Avinash Jadhav MNS : 'मनसे'ला कोर्टात धक्का! बिनविरोध नगरसेवकांवरील याचिकेवर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

विजय वडेट्टीवार म्हणाले, "त्यांचे त्यांनाच ठावूक. ब्रश करताना एक, जेवताना दुसरेच आणि झोपताना तिसरेच, काहीतरी बोलतात. त्यांच्या मनात आणि पोटात काय आहे, हे आम्हाला कसे कळेल? तसेही पवार जे बोलतात, ते ओळखण्याची 'पॉवर' आमच्यात नाही."

Pawar NCP unity
Voter Bribery : भाव फुटलाच! मतदार कुटुंबाला 10 हजार? व्हिडिओ व्हायरल; निवडणूक आयोग निष्प्रभ?

अजित पवारांचा सिंचन घोटाळा

अजित पवार आघाडीबरोबर सत्तेत असताना, उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी संचिन घोटाळ्याचे आरोप झाले. त्यावेळी श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. त्यात आरोप सिद्ध झाले नव्हते, असा दावा केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यावर मिश्किल टिप्पणी केली.

...सगळी नुरा कुस्ती!

'अजित पवार म्हणतात तेही खरे आहे, भाजप म्हणतो तेही खरे आहे. पण हे सत्य समोर आणणार कोण? उद्या निवडणूक संपली की हेच लोक मांडिला मांडी लावून बसतील आणि राज्य लुटतील. ही सगळी नुरा कुस्ती आहे,' अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com