Eknath Shinde : अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं? शिंदेंच्या आमदाराने दिले मोठे संकेत...

Eknath Shinde MLA : काल दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक पार पडली या बैठकीत काय घडलं यावर शिंदेंच्या आमदाराने दिले मोठे संकेत दिले आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेची सर्व सूत्र दिल्लीतून हलत आहेत. यासाठीच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गुरूवारी मध्यरात्री बैठक पार पडली.

या बैठकीत काय निर्णय झाला याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीत काय घडलं यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, काल सव्वा दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असावेत. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्‍याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Devendra Fadnavis Politics: देवेंद्र फडणवीस यांच्यावर अपेक्षांचे ओझे?, खानदेशच्या आमदारांना हव्यात सहा एमआयडीसी!

जेव्हा मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर हाईल त्यानंतर आरोग्य खात, गृह खात कोणाकडे तसेच अर्थ खात कोणाकडे आणि कोणत्या पक्षाकडे किती खाते द्यायची याचाही निर्णय या बैठकीत झाला असावा. याची घोषणा तिनही नेते मिळून एकत्रित करतील.

उपमुख्यमंत्रिपद घेऊ नये? आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केंद्रात जाणार का? या प्रश्नावर बाोलताना शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅन म्हणून जी प्रतिमा उंचावलेली आहे, त्याला सोडून ते दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. आता कोणतं पद स्वीकारायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. जेव्हा पक्षाचा गटनेता म्हणून निवड केली आहे. त्यामुळे सर्व निर्णय घेयचे अधिकार त्यांचे आहेत. ते योग्य वेळेला योग्य निर्णय घेतात. ते उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

Eknath Shinde
Hemant Soren Decision : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी वेटिंगवर, तिकडं सोरेन यांचा धडाका सुरू; महिलांना दिलं मोठं गिफ्ट

प्रत्येक पक्षाला वाटतं आपल्या पक्षाकडे वजनदार खाती असावी. खाती चांगली असली काम करायला वाव मिळतो. संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याची ताकद आमच्यात आहे. चांगली खाती असली तर आणखी चांगलं काम करू एवढी त्या मागची भावना आहे. येत्या दोन दिवसात कळेल त्यासंदर्भातला निर्णय कळेल, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com