Devendra Fadnavis News : महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत नंबर वन! आता आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही

Maharashtra ranks number one in foreign investment across India, announced CM Devendra Fadnavis, stating confidently that "no one can stop us now. : संपूर्ण आर्थिक वर्षात महाराष्ट्राने एकूण 1,64,875 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशातील एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी 40 टक्के आहे.
Devendra Fadnavis On Maharashtra Growth News
Devendra Fadnavis On Maharashtra Growth NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज देशातील परकीय गुंतवणुकीची राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली असून, त्यानुसार महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी पोहोचला आहे. एकट्या महाराष्ट्रात एकूण गुंतवणुकीच्या तब्बल 40 टक्के परकीय गुंतवणूक झाली असून, ही आकडेवारी राज्यासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

परभणीत भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) आयोजित कृतज्ञता सोहळ्यात फडणवीस बोलत होते. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्रात 25 हजार 441 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली. संपूर्ण आर्थिक वर्षात महाराष्ट्राने एकूण 1,64,875 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशातील एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी 40 टक्के आहे. ही गतवर्षीच्या तुलनेत 32 टक्के वाढ आहे, आणि गेल्या 10 वर्षांतील विक्रमी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) यावेळी राज्य सरकारच्या विविध योजनांचा व कामकाजाचा आढावा देखील घेतला. 2026 अखेरपर्यंत राज्यात 12 तास नियमित वीज पुरवठा सुनिश्चित केला जाईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून राज्याला ऊर्जा स्वावलंबन प्राप्त होईल. राज्य सरकारचा कारभार पारदर्शक, गतीशील आणि लोकाभिमुख करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे.

Devendra Fadnavis On Maharashtra Growth News
Sanjay Raut-Devendra Fadnavis News : आपणास वाचनाची आवड, म्हणून पुस्तक पाठवत आहे! 'नरकातील स्वर्ग'ची प्रत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली

पहिल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात 750 पेक्षा अधिक मुद्द्यांवर काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सुरू आहे. पुढील टप्प्यात 150 दिवसांचा कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर राज्यातील 1200 सरकारी सेवा उपलब्ध करणारे अ‍ॅप सुरु होणार आहे. यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात न जाता घरी बसूनच सेवा मिळतील.

Devendra Fadnavis On Maharashtra Growth News
BJP Politics: पक्षांतर्गत गटबाजीवर भाजपने केला जालीम उपाय; शरद पवारांच्या नेत्याला देणार नेतृत्व!

फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या घौडदौडीचे श्रेय राज्यातील जनतेसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिले. महाराष्ट्रास आता कोणीही थांबवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. परभणी जिल्ह्याला आतापर्यंत बाहेरचा पालकमंत्री दिला जात होता. पण आमच्या मेघनाताई बोर्डीकर मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. गेल्या पाच वर्षात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यामुळे त्याना फक्त मंत्रीच नाही, तर पालकमंत्री करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com