Sanjay Raut-Devendra Fadnavis News : आपणास वाचनाची आवड, म्हणून पुस्तक पाठवत आहे! 'नरकातील स्वर्ग'ची प्रत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली

Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut has sent a copy of his book Narakatil Swarg to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis. : मी कादंबऱ्या वाचनं कधीच सोडलेलं आहे. कथा-कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझ वय राहिलेलं नाही. त्यामुळेच मी असल्या गोष्टी वाचत नाही, अशा शब्दात फडणवीस पुस्तकाची खिल्ली उडवली होती.
Sanjay Raut-Devendra Fadnavis News
Sanjay Raut-Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या तुरुंगातील अनुभव आणि आठवणींवर आधारीत 'नरकातील स्वर्ग'हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले. या पुस्तकाने प्रकाशन सोहळ्या आधाची राज्याच्या राजकारणात अक्षरश: धुमाकूळ घातला. राऊत यांनी आपल्या रोखठोक शैलीत पुस्तकात अनेक प्रसंग, अनुभव आणि देश-राज्य पातळीवरील अनेक गोष्टींचा खुलासा, उलगडा आणि दावे केले. जे सत्ताधारी भाजपाला झोंबणारे होते.

संजय राऊत (Sanjay Raut) हे आरोपी आहेत, त्यांनी लिहलेल्या पुस्तकाला काय किमंत द्यायची, अशा टोकाच्या प्रतिक्रिया शिंदेची शिवसेना, भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून दिल्या गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर कोण संजय राऊत, मी कादंबऱ्या वाचनं कधीच सोडलेलं आहे. कथा-कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझ वय राहिलेलं नाही. त्यामुळेच मी असल्या गोष्टी वाचत नाही, अशा शब्दात फडणवीस पुस्तकाची खिल्ली उडवली होती. त्यांचे सोडून द्या, ते कोण आहे. ते खूप मोठे नेते आहेत का? असा सवालही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अनेक खुलासे राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केल्याने भाजपचे नेते राऊत यांच्यावर तुटून पडले होते. मी बालवाड्मय वाचत नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आता संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे. स्वतःच्या स्वाक्षरीसह पाठवलेल्या पुस्तकासोबत एक पत्रही राऊत यांनी लिहले आहे.

Sanjay Raut-Devendra Fadnavis News
Sanjay Raut Politics: धक्कादायक;भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्याच ‘ईडी’चे दलाल, केली शेकडो कोटींची वसुली?

यात प्रिय, श्री देवेंद्रजी जय महाराष्ट्र! नरकातील स्वर्ग या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. श्री जावेद अख्तर श्री शरद पवार श्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत पुस्तकाचे दिमागदार प्रकाशन झाले. पुस्तकास मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे देशातील व राज्यातील जुलमी शासन व्यवस्थेने एका खोट्या प्रकरणात शंभर दिवसांसाठी मला तुरुंगात पाठविले. त्यात माझी व माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली.

Sanjay Raut-Devendra Fadnavis News
Satyajeet Tambe on Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कामात दिसते काँग्रेस नेत्याची 'झलक'; सत्यजीत तांबे म्हणाले, 'लिडर असावा तर...'

लोकशाहीत विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने ही मुस्काटदाबी केली. तुरुंगातील विदारक अनुभव व माझ्या गजाआडील चिंतनावर हे पुस्तक निर्माण झाले. आपणास वाचनाची आवड असल्यानेच हे पुस्तक मी आपणास पाठवीत आहे, कळावे आपला संजय राऊत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com