Weekly Horoscope : महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी होणार; सत्ताधारी पक्षांसाठी तीन महिने प्रतिकूल; फूट पडणार...

Major political changes expected in Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून युती-आघाडीबाबत गोंधळाचे वातावरण राहील. अनेक ठिकाणी स्वतंत्र लढण्याचे संकेत मिळतील. या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणात होतील.
maharashtra Politics Astrology Predictions
maharashtra Politics Astrology Predictions Sarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

16 जुलैच्या कर्क संक्रमण कुंडलीमध्ये धनू लग्न उदित असून, रवी अष्टमात आहे. सोबत बुध असून, प्रतियोगात प्लुटो धनस्थानी आहे. याशिवाय तृतीयात राहू, चतुर्थात चंद्र, शनी, नेपच्यून, षष्ठात शुक्र-हर्षल, सप्तमात गुरू, भाग्यस्थानी मंगळ-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांवर या ग्रहयोगाचा परिणाम होणार असून, या काळात अतिवृष्टी, पूर, प्रलय, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठी हानी होण्याची शक्य‌ता राहील. विशेषतः पूर्व, उत्तर भारतात मोठी नैसर्गिक आपत्ती संभवते. अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

विशेषतः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती दर्शविते. कोल्हापूर, सांगली, मुंबई, कोकण याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागात अतिवृष्टीची शक्यता राहील. उत्तर भारतात अतिवृष्टीबरोबर भूस्खलन, हेलिकॉप्टर, विमान अपघात यांमधून मोठी हानी संभवते. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर यांसह उत्तर भारतात मोठी दुर्घटना संभवते.

चतुर्थात चंद्र-शनी असून, त्यावर मंगळाची दृष्टी असल्याने देशांतर्गत शांतता बिघडविण्याचे प्रयत्न होतील. मोठे अपघात, घातपात, दहशतवादी कारवाया, स्फोट घडविण्याचे प्रयत्न होतील. माओवाद्यांकडून हिंसाचार घडविण्याचे प्रयत्न होतील. या योगामुळे मोठी जहाज दुर्घटना, उंच लाटा, त्सुनामी यांसारख्या घटनांमधून मोठी हानी संभवते.

अष्टमातील रवी-बुध योगामुळे या तीन महिन्यांत (जुलै ते सप्टेंबर) मोठ्या राजकीय व्यक्ती, लेखक, साहित्यिक, पत्रकार, संशोधक या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूची घटना संभवते. रवी-प्लुटो प्रतियोगामुळे या काळात सामूहिक दुर्घटना व मोठ्या संख्येने अपघाती मृत्यूच्या घटना संभवतात.

maharashtra Politics Astrology Predictions
Hindi Imposition: डॉ. नरेंद्र जाधव हे BJP अन् RSSचे निकटवर्तीय;  त्रिभाषा समितीला डॉ. दीपक पवार यांचा विरोध

अष्टमातील रवी-बुध योगामुळे सत्ताधारी पक्षासाठी पुढील तीन महिन्यांचा काळ प्रतिकूल राहील. निवडणुका झाल्यास विरोधी पक्षांची ताकद वाढेल. या योगामुळे काही राज्यांतील सरकार अल्पमतात येईल. सत्ताधारी आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता राहील. मोठ्या पक्षात फूट पडेल. महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील.

चंद्र, शनी, नेपच्यून योगामुळे विरोधी पक्षांत गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून युती-आघाडीबाबत गोंधळाचे वातावरण राहील. अनेक ठिकाणी स्वतंत्र लढण्याचे संकेत मिळतील. या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणात होतील.

मंगळ-केतू योगामुळे भारतीय खेळाडूंना संमिश्र यश मिळेल. शेअर मार्केटमध्ये तेजी कायम राहणार असून, सोन्या-चांदीच्या भावात घट होण्याची शक्यता राहील. केंद्रस्थानी गुरू असल्यामुळे सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील. मात्र धार्मिक, स्थळे, उत्सव अशा ठिकाणी चेंगराचेंगरी, अपघात, घातपात यांची शक्यता राहील.

या काळात धार्मिक किंवा जातीय वादविवाद वाढल्याची शक्यता असून, यावरून संप, बंद, निदर्शने, आंदोलने होण्याची शक्यता राहील. स्फोटक वक्तव्यावरून नेते, धार्मिक व क्षेत्रातील व्यक्ती वादविवादात अडकतील. धनूलग्न व सप्तमात गुरू असल्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होतील. लोकांमध्ये सण, उत्सवामध्ये मोठा उत्साह दिसेल. पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठे राहील. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशांना मोठा धोका राहील. जहाज किंवा बोट दुर्घटना मोठ्या प्रमाणात अनुभवास येईल. आत्महत्यांचे प्रमाण मोठे राहील.

साप्ताहिक राशिभविष्य ५ ते ११ जुलै २०२५

मेष : सप्ताहात सुरुवातीला जोडीदाराकडून मोठे सहकार्य मिळेल. भागीदारीत मोठे लाभ होतील. वारसा हक्क, पेन्शन विमा संबंधित कामात यश मिळेल. भाग्यस्थानात होणारी पौर्णिमा भाग्योदयकारक राहील.

वृषभ : नोकरीत चांगले बदल होतील. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्यात उत्तम सुधारणा होईल. सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीतील व्यवसायाची संधी मिळेल.

मिथुन : संततीविषयक कामे मार्गी लागतील. मुलांसाठी मोठे खर्च होतील. शेअर मार्केटमध्ये मोठा फायदा होईल. सप्ताहात दूरचे प्रवास होती. नोकरी निमित्ताने प्रवास करावे लागतील.

कर्क : घर, जागा, प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीची कामे होतील. घर, जागेमधून मोठे लाभ होतील. वाहन, उंची वस्तूंची खरेदी होईल. सप्ताहात मुलांचे प्रश्न मार्गी लागतील.

सिंह : सप्ताहाच्या सुरुवातीला छोटे प्रवास, सहली कराल. भावंडे, नातेवाइकांचा सहवास लाभेल. आनंदाची बातमी कळेल. सप्ताहात घर, जागा, वाहन विक्रीचे व्यवहार होतील.

कन्या : कुटुंबात आनंदाची घटना घडेल. आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. धनसंचय होईल. मोठी गुंतवणूक होईल. सप्ताहात छोटे प्रवास, सहली होतील.

तूळ : सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. वारसा हक्काची कामे होतील. सप्ताहात कौटुंबिक कामात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

वृश्चिक : मोठे प्रवास होतील. विवाह समारंभासाठी मोठे खर्च होतील. परदेशगमनासाठी प्रयत्न होतील. कर्जाची कामे होतील. सप्ताहात आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी उत्साही राहील. तरुणांचे विवाह जमतील.

धनू : मित्रांचा सहवास मिळेल.पार्टी, मनोरंजन यासाठी खर्च कराल. नोकरीत मनासारखे बदल होतील. सप्ताहात मोठे प्रवास होतील. कर्जमंजूर होईल. मोठे खर्च कराल. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल.

मकर : राजकीय सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. अधिकार, मोठे पद मिळेल. समाजात मोठे आर्थिक लाभ होतील. मोठी इच्छा पूर्ण होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : कलाकारांना प्रसिद्धी, नावलौकीक मिळेल. महत्त्वाची बातमी कळेल. समाजात नवीन नोकरी व्यवसायाची संधी मिळेल. सामाजिक-राजकीय कार्यक्षेत्रात पद, प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांची मर्जी राखाल.

मीन : सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात काळजी घ्यावी लागेल. विमा, वारसा हक्क, पेन्शनची कामे होतील. अनपेक्षित लाभ होतील. सप्ताहात तीर्थयात्रा, धार्मिक विधी होतील. प्रसिद्धी, नावलौकीक मिळेल. गुरुजनांचा सहवास, आशीर्वाद लाभेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com