Maharashtra Political Live Updates: मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांचा मोठा निर्णय; लोकलच्या डब्यांचं डिझाईनच बदलणार

Sarkarnama Political News Updates : वाचा महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर....
mumbai local accident .jpg
mumbai local accident .jpgSarkarnama
Published on
Updated on

मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांचा मोठा निर्णय; लोकलच्या डब्यांचं डिझाईनच बदलणार 

मुंब्रा येथील लोकल अपघातानं आता रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आता मुंबई लोकलच्या डब्यांचं संपूर्ण डिझाईन बदलण्यात येणार आहे. लोकल ट्रेनचा नवा लूक नोव्हेंबर 2025 रोजी तयार होणार असून जानेवारी 2026 रोजी ट्रॅकवर धावणार आहे. मुंब्रा अपघातानंतर लोकलच्या डब्यांचं डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-सोलापूर विमानसेवा सुरू होणार, मुरलीधर मोहोळ 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-सोलापूर विमानसेवेची घोषणा केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही विमानसेवा सुरू होईल, असंही त्यांनी म्हटलं.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सांगली महापालिकेचे उपायुक्तांवर मोठी कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सांगली महापालिकेचे उपायुक्तांवर कारवाई केली आहे. तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विदर्भात मान्सूनचे आगमन 12 जूनपर्यंत लांबणीवर, सध्या तापमान पोहोचलं 43 अंश सेल्सिअसवर

विदर्भात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे आता 12 जूनपर्यंत तीव्र उष्णतेच्या झळांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सध्या तिथे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून उत्तरेकडून येत असलेल्या गरम वाऱ्यांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. 12 जूननंतर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, तो किती प्रमाणात पडेल याविषयी साशंकता वर्तवली जात आहे.

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेविरोधात मनसेचा धडक मोर्चा 

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेविरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिली. यावेळी मनसेकडून रेल्वेसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांची कामे रोखल्याचा आरोप, आमदार क्षीरसागरांविरोधात छेडलं आंदोलन  

बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची कामे रोखल्याचा आरोप केला आहे. त्याचमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर क्षीरसागर यांच्याविरोधातलं वातावरण तापलं असून आंदोलन छेडण्यात आलं आहे.

राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या घडामोडींना वेग आला आहे. मनसे शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) युतीच्याही चर्चांना उधाण आले असतानाच पुण्यात राज ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com