माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. याचदरम्यान, शरद पवार यांनी सत्तेतील लोकांनीच कारखान्याची निवडणूक लढवणं योग्य नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. सत्तेत बसलेली व्यक्ती कारखान्यावर असेल तर कारखान्यातील विरोधी गटानं एखादा मुद्दा उपस्थित केला तर ही नेतेमंडळी त्यांना न्याय देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.
भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून एका बँक मॅनेजरला शिवीगाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. आमदार नारायण कुचे यांनी बँकेच्या मॅनेजरला शिवीगाळ केल्याचा मोबाईलवरील संवादाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. नारायण कुचे यांनी जालन्यातील जामखेड येथील युनियन बँकेचे मॅनेजर ललित शिर्लेकर यांना फोनवरून शिवीगाळ केली होती. तीन दिवसांपूर्वीची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती समोर येतेय.
हिंदी भाषा पहिली ते पाचवीपर्यंत सक्तीची करणं योग्य नाहीच. पण हिंदी भाषेला कमी लेखणं देखील बरोबर नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं आहे. देशात 55 टक्के जनता हिंदी भाषिक आहे. त्यामुळे व्यवहार करता आला पाहिजे, असंही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.
महायुती राज्य सरकारमधील ई-कॅबिनेटला मंगळवारी (ता.24) सुरूवात करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले आहे. बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये, म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा काढण्यात आला आहे. आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले.
मोठी बातमी: राज्य परिवहन महामंडळानं महत्त्वाचा निर्णय, एसटी बसचं लाईव्ह लोकेशन समजणार
राज्य परिवहन महामंडळानं मोठा निर्णय घेतला आहे. आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस कुठपर्यंत पोहोचली हे समजणार आहे. एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी अॅप येत्या 15 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.