
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त २३ जानेवारी रोजी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार आहेत.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन मोठा वादंग निर्माण असतानाच आता शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची कोणतीच सीट लोकसभेला निवडून आलं नाही. मात्र, रायगडचा किल्ला राखण्यात यश आलं. कारण आम्ही तिघांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुनील तटकरे निवडून आले.पण त्यांनी आमच्या तीन उमेदवारांना तिघांना पाडण्याचा प्रयत्न केला.याचवेळी गोगावले समर्थकांनी मुक्तागिरी बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत.दावोसमधून महाराष्ट्रासाठी मोठी माहिती समोर येत आहे.तिथे पहिल्याच दिवशी विक्रमी पाच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्र सरकारने नोंदवली आहे.यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील सर्व भाजप उमेदवारांना आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.
अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला. ज्यात तो जखमी झाला होता. याप्रकरणात बांगलादेशी तरूणाचा हात उघड झाल्यानंतर आता बेकायदेशीर बांगलादेशींना बाहेर काढा अशी मागणी होत आहे. याबाबत शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले आहे. ज्यात त्यांनी राज्यात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशींना लवकरात लवकर बाहेर काढा अशी मागणी केली आहे. तसेच सैफ अली खानच्या घरी घडलेली घटना अतिशय चिंताजनक असून मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी हे ऑडिट आवश्यक असल्याचेही देवरा यांनी म्हटले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढयच्या की पक्षांनी स्वबळाचा विचार करायचा यावर आता महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीसाठी नेते शिवालयावर येत आहेत. सध्या जयंत पाटील, नाना पटोले आणि नसीम खान दाखल झाले असून ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब देखील उपस्थित आहेत.
महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. नाशिक आणि रायगडवरून पेच निर्माण झाल्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठीच ती जागा भाजपला हवी आहे. आमची भूमीका राष्ट्रवादी आणि शिवसेनेने समजून घ्यावी, असेही बावनकुळे म्हणाले.
महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या नुकत्याच झाल्या आहेत. पण शिवसेनेत यानंतर वाद उघड झाला असून नाराजीही समोर आली आहे. यानंतर आता पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीतही धुसफूस सुरू झाली आहे. ही धुसफूस स्वजिल्हे न दिल्यावरून सुरू झाली आहे.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्याकाडांमुले राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. अशावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मस्साजोगमध्ये का गेले नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय. यावर आता मंत्री पंकजा मुंडे उत्तर दिले आहे. त्यांनी, देशमुख कुटुंबियांनीच आपल्याला भेटण्यासाठी येऊ नये, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे मस्साजोगमध्ये गेले नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.
बीड जिल्ह्यातील बोगस पिकविमा घोटाळा चांगलाच गाजत असताना धाराशिव जिल्ह्यातील पिकविमा घोटाळा ही आता बाहेर आला आहे. जिल्ह्यातील 565 शेतकऱ्यांनी शासकीय जमिनीवर विमा काढल्याचे आढळले असून ते दोषी ठरले आहेत. 565 शेतकऱ्यांनी 1 हजार 170 अर्जाद्वारे शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेतजमीन पिकविमा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकला. आयोगाने लोकशाहीचा गळा घोटला अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
अभिनेता सैफ अली खान याला डिस्चार्ज देण्यात आला असून तो त्याच्या वांद्रे येथील राहत्या घराकडे निगाला आहे. सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी राहत्या घरात चाकू हल्ला झाला होता. तर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यात खून, खंडणी, अपहरण, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. बीडमधील माफियाराज सत्तेतील एका मंत्र्याच्या आशिर्वादानेच सुरु असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तर याची माहिती गृहविभागाकडे असून ती लपवली जातेय. खूर्ची वाचवण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील सारथी संस्थेला भेट दिली आहे. त्यांनी सारथी संस्थेच्या नवीन इमारतीची पाहणीही या वेळी केली आहे. त्यांच्यासोबत या वेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटीलही होते.
पीकविमा योजना चुकीची नाही. पण योजनेचा गैरफायदा घेतला जात आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितीने 350 कोटींचा भ्रष्टाचार दाखवलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, बोगस पीकविमा प्रकरणी स्वतंत्र समिती नेमा. केवळ 350 कोटी नव्हे तर पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा निघेल. ही योजना शेतकऱ्यांसााठी चांगली आहे, ती बंद करू नये. या योजनेतील दलालांवर मोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
एक रुपया पीकविमा योजनेत गैरव्यवहार झाले आहेत. हे फक्त मंत्र्यांनीच अथवा अधिकाऱ्यांनी केले आहे, असे नाही तर सीएससी केंद्राच्या चालकांनी स्वतःच्या मानधन वाढीसाठी केलेले आहेत. आमदार सुरेश धस यांनी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय आरोप केले आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. अद्याप पैसे दिलेले नाही, त्यामुळे सरकारचे पैसे वाचले आहेत. असा प्रकार असेल तर चौकशीतून ते पुढे येईल. सुरेश धस यांनी मांडलेले गोष्टींची शहनिशा केली आहे. जे चुकीचे हेाते, ते आपण सर्व थांबवले आहे. बोगस पीकविम्याप्रकरणी ९६ सीएससी केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अनेक आरोपी आहेत. पीएसआय राजेश पाटील यांनाही खंडणी प्रकरणात आरोपी करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार हे बीडचे नवे पालकमंत्री आहेत. अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर मुंडे यांनी प्रथमच पवार यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी महायुतीसंदर्भात मोठे विधान केले आहे. महायुती सरकार हे शापित आहे, असे महायुतीमधीलच एका बड्या मंत्र्याने पत्रकारांसोबत खासगीत बोलताना हे विधान केले आहे, असा दावा खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या लोकांना पाडायचं आणि पडलेल्या नेत्यांना निवडून आणायचं, असे उद्योग या सरकारने केले आहेत, असेही लंके यांनी म्हटले आहे. ईव्हीएमच्या जोरावर निवडलेले सरकार जास्त काळ टिकत नाही, असा दावाही लंके यांनी केला आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळांचा जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
मस्साजोगमधील आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. आरोपी विष्णु चाटे याच्या केजमधील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता, तेव्हाचे हे फुटेज आहे. यामध्ये प्रतिक घुले, सुदर्शन घुले हेही दिसत आहे. तसेच काही पोलिसही असल्याने खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे आज निधी वाटपासंदर्भात मंत्रालयात बैठक घेणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही पहिलीच बैठक होत असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
सरकारी योजनांसाठी काम करणारे आरोग्य मित्र १२ फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहे. वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी त्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
रायगडचे पालकमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी कंबर कसली आहे. पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रायगडसह नाशिकच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. गोगावले यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामेही दिले. आता काही पदाधिकारी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गोगावलेंच्या पालकमंत्रिपदासाठी साकडे घालणार आहेत.
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर छत्तीसगड पोलिस आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांशी केलेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला मोठे यश म्हटले आहे. शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये नक्षलवादाच्या विरोधात सुरक्षा दलांच्या मोठ्या यशाची माहिती दिली.
'वन नेशन वन इलेक्शन' या दोन विधेयकांवरील संयुक्त संसदीय समितीची (JPC) पुढील बैठक ३१ जानेवारीला होणार आहे. या समितीची वैशिष्ट्य म्हणजे विधेयकाचे परीक्षण करणे आणि विधेयकातील संबंधित तरतुदींवर विचार करणे हे आहे, ज्यामुळे देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.
शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला. आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार
'दिल्लीत भाजप सरकार स्थापन झाल्यास अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १००० रुपये मिळतील', असे अनुराग ठाकूर म्हणाले.
पुण्यातील बिबवेवाडी भागात बार मधील कर्मचाऱ्यांकडून २ तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. काठी, दांडके, बांबूने जबर मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील बिबवेवाडीमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बारमध्ये तीन तरुण गेले होते. दारूच्या नशेत ते गोंधळ घालत होते, काही केल्या ऐकत नव्हते. बार मधील कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. 5 फेब्रुवारीला ते येथे जाणार असून तिथे दर्शन घेणार आहे.
मुंबई पोलिसांची टीम पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी सीन रिक्रिएशनसाठी पोहोचली आहे. सीन रिक्रिएशननंतर मुंबई पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि तेथे त्याची चौकशी केली.
शक्तीपीठ महामार्गावरुन सांगलीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. हा महामार्ग रद्द करा, अन्यथा बंदुका घेऊन,गोळ्या घालू , असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, यासाठी सांगलीतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. कोणाचीही मागणी नसताना केवळ आमदार,खासदार आणि ठेकेदारांना देवाच्या नावाखाली जगण्यासाठी भाजपाने हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
Mumbai News: बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला फाशी देणं सहज शक्य होते, पण त्यांचा फेक एन्काऊंटर करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने अक्षय शिंदेंचा एन्कांऊटर झाला का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Beed: बीड जिल्ह्यातील १३ सरंपच, ४१८ सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यावर जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक असते. बीड जिल्ह्यातील १३ सरंपच, ४१८ सदस्यांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिले नसल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा हा बडगा उगारला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यापूर्वी दिल्लीतील 5 हजार पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संख्या अधिक आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. 8 फेब्रुवारी रोजी निकाल आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची एकत्र बैठक आज मुंंबईत सांयकाळी पाच वाजता आयोजित केली आहे. तिनही पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराज साखरे यांचे वयाच्या 89 वर्षी निधन झाले. साखरे महाराज यांचे प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी चिंचवडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारीला साजरी केली जाते. त्या निमित्त सायनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर लावले होते. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांने हे बॅनर हटवल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. आक्रमक शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.