
जी भाषा निवडतील त्यासाठी साप्ताहिक फक्त पाच तासिका निश्चित केल्या आहेत. इयत्ता पहिली व दुसरीमध्ये शिकवत असताना चित्र दाखवून, बडबड गीते... त्याला मौखिक म्हणतो, असे शिक्षण दिले जाते. तिसऱ्या भाषेच्या निर्णयातही इयत्ता पहिली व दुसरीसाठी मौखिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. पुस्तके ही केवळ शिक्षकांसाठी असतील. विद्यार्थ्यांवर पुस्तके लादली जाणार नाहीत. अशापध्दतीचे नियोजन असणार आहे. तिसरी भाषा म्हणून इयत्ता तिसरीपासून पुढे पुस्तके असतील. भारतातील २० ते २२ भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्यांना निवडता येईल. विद्यार्थी जी भाषा निवडतील त्याचे ई-प्रणालीद्वारे शिक्षण दिले जाईल, असे दादा भुसेंनी स्पष्ट केले.
हिंदी सक्ती सरकारला करायची नाही. ही भूमिका असतानाही अनेक चर्चा होत आहेत. अनेक पत्रकार परिषदा होत आहेत. शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी असावी, अशी शिफारस होते. तो अहवाल ज्यांनी स्वीकारला तेच आता पत्रकार परिषद घेत आहेत, अशी टीका उदय सामंत यांनी केली. विशेष म्हणजे सामंत हे ठाकरे सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री व उबाठाच्या पक्षप्रमुख आता सांगत आहेत की, हिंदी सक्ती करू नका. मग त्यावेळी अहवाल स्वीकारलाच नसता तर हिंदी सक्ती हा शब्दप्रयोगच आला नसता, असे सांगत सामंतांनी ठाकरेंवरच पलटवार केला.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा जुलैच्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्रातील जनतेतून १२ हजारांहून अधिक सुचना आल्या. समितीमध्ये आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह आमच्या इतर आमदारांच्या पाच बैठका झाल्या. आज अंतिम बैठक झाली. कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांना व त्यांना मदत करणाऱ्यांसाठी हा कायदा आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील युवा पिढीला नक्षली चळवळीकडे रोखण्यासाठी हा कायदा आहे. महाराष्ट्रात या कायद्याची गरज होती, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचे कोडे लवकरच उलगडणार आहे. विमानातील ब्लॅक बॉक्समधील टाडा मिळविण्यात यंत्रणांना यश आले आहे. या डाटाचे आता विश्लेषण सुरू असून लवकरच अपघाताचे कारण समोर येऊ शकेल. एएआयबीच्या प्रयोगशाळेत हा डाटा रिकव्हर करण्यात आला आहे. या अपघातामध्ये विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला होता. एक प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे.
देशात दुचाकी वाहनांनाही टोल द्यावा लागणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून प्रसिध्द होत आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत म्हटले आहे की, काही मीडिया हाऊसेसकडून दुचाकी वाहनांना टोल लावला जाणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहे. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना सुट कायम राहील. कोणतेही सत्य जाणून न घेता अफवा पसरवणे, हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. मी त्याची निंदा करतो, असे गडकरी म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.