

नीट आणि टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे.याला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून तात्काळ या दोन्ही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा तात्काळ द्यावा या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने धाराशिव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून मशाल आंदोलन करण्यात आलं.यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले
माजी खासदार संजय काका पाटील यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील प्रमुख मंडळींचा एकत्रित प्रवेश घेतला जाईल असा भाजपच्या वरिष्ठ गोटातून त्यांना निरोप देण्यात आला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते की, 'तुमचा एकही खासदार महायुतीत जाणार नाही, हे लिहून द्या.' मात्र त्यावेळी आमच्या भूमिकेची खिल्ली उडवण्यात आली. आता आम्ही त्यावेळी अशी हमी का मागितली होती, हे सर्वांच्या लक्षात आले असेल. आमची मते घेऊन नंतर भाजपमध्ये जाणार असाल, तर ती मतदारांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे.
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ममदापूर येथे दोन सख्ख्या भावांमध्ये असलेल्या जमिनीचा वाद पुतण्याच्या जीवावर बेतला,जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणी मध्ये अर्जुन भीमराव चव्हाण या 22 वर्ष तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने अवघ्या चार तासात 11 आरोपींना ताब्यात घेतले यात एक विधी संघर्षित बालक देखील आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणावर विधान सभेत सोमवारी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत असताना मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. त्यांच्या निवेदनावर भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार भडकले. त्यांनी सरकारला घेरत मंत्री भुसे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
* नाशिक महानगरपालिकेच्या सिडको प्रभाग समितीच्या सभेत नगरसेवकांची एकमेकांना शिवीगाळ
* अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यामध्ये झाली शिवीगाळ
* भर सभेत शिवीगाळ झाल्याने उडाला गोंधळ
* शहरातील दूषित पाणीपुरवठ्याविरोधात सभागृहात सभापतींना दूषित पाण्याची बाटली न देता ती अधिकाऱ्यांना द्यावी, अशी भूमिका मुकेश शहाणे यांनी घेतली
* तर सुधाकर बडगुजर यांनी नगरसेवकांना प्रश्न मांडू द्या, असं म्हणत मुकेश शहाणे यांना बोलताना रोखल्याने झाला वाद
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा एक महिन्याचा अल्टिमेटम दिलाय... महिनाभरात ठोस परिणाम न दिसल्यास बदली किंवा निलंबनाची कारवाई केली जाणार आहे... एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून अधिकारी वर्गाने जबाबदारीने काम करावे असे सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश दिलेत... एप्रिल-मे महिन्यात भाडेवाढ असूनही एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने सरनाईकांनी नाराजी व्यक्त केलीय...
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण आलंय...आरोपी सियाचा लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट हा केवळ केतनची हत्या करण्यासाठीच होता, असा खळबळजनक आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केलाय...अवघ्या 12 दिवसांत तिने चारवेळा लोहगडला जाण्याचा आग्रह धरला होता...कुटुंबीयांनी परवानगी नाकारली तेव्हा तिने मोठा आकांडतांडव करत केतनला त्रास दिला होता, असे अग्रवाल कुटुंबाने पोलीस तक्रारीत म्हटलंय...
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात संशियत आरोपी सिया आणि चेतनला कोर्टात आणलं
सियाचे आई-वडील आणि भाऊही कोर्टात दाखल झाले आहेत.
काँग्रेसचे नेते अतुल लोंढेंनी ऑपरेशन टायगरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय... कम्पाऊंडर कधी ऑपरेशन करू शकत नाही... ऑपरेशन तर फडणवीस आणि अमित शाहांनी केलंय असा टोलाही त्यांनी लगावला.
विलास घुले हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळालंय. या हत्येमागे केवळ वाद सोडवण्याचा विषय नसून, महिला छळ, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराचे गंभीर कारण असल्याचा खळबळजनक आरोप एका स्थानिक महिलेने केलाय. विलास घुलेचा मित्र उमेश माने याने आक्षेपार्ह व्हिडिओ काढून आपल्याला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याचा दावा या महिलेने केला आहे.... त्यामुळे या प्रकरणात एक नवं वळण आलंय
कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर जोरदार आंदोलन छेडले. कृषी आयुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले. यावेळी काही महिला आंदोलनकर्त्यांनी इमारतीवर चढून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार करत हत्या केल्या प्रकरणी आरोपी भीमाराव कांबळे याला न्यायालयाकडून त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार करत हत्या केल्या प्रकरणी आरोपी भीमाराव कांबळे याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान, कोर्टात सुनावणी सुरू असताना नागरिकांकडून आरोपी भीमराव याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
काही झालं तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा शब्द कैलास पाटील यांनी दिला. तसेच तर काही झालं तरी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे वचन उद्धव ठाकरे यांना कैलास पाटील यांना भरसभेत दिले.
नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार करत हत्या केल्या प्रकरणी आरोपी भीमाराव कांबळे याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाकडून त्याला कुठली शिक्षा दिली जाणार जन्मठेप की फाशीची शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पाच वर्षापुर्वी म्हणजेच 2019 मध्ये मला परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली होती. तरी आमदार राहुल पाटील यांनी सोयऱ्या धायऱ्याचे काम केले, राजकारण केले. मी पक्षाचा असून विरोधात काम आणि राजेश विटेकरचे काम केले. त्यामुळे ज्याने गद्दारी केली आहे, त्याने माझ्यावर गद्दारीचा आरोप करू नये, अशा शब्दात खासदार संजय जाधव यांनी राहुल पाटील यांच्या टीकेवर पलटवार केला.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले. 'उद्धवजींना माझा सल्ला आहे त्यांनी आता सबुरीने घ्याव, दुसऱ्याला दोष देऊन प्रश्न सुटत नाहीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.उद्धव ठाकरेंना सहा खासदार सोडून गेल्याच दुःख होईल. याचं दोषण दुसऱ्याला देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास ते करतील, त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे ते म्हणाले.
- पुणे ग्रामीण पोलिस आरोपी भीमराव कांबळे ला कोर्टात हजर करणार
- पीडितीचे कुटुंब आणि त्यांचे सदस्यांना कोर्ट रुममध्ये बसण्याची परवानगी
- विशेष सरकारी वकील अजय मिसर उपस्थित राहणार.
- सकाळी ११ वाजता विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे कोर्ट रुम मध्ये येणार.
- सन्माननीय न्यायाधीश निकालाचे वाचन करायला सुरुवात करतील.
- शिक्षा का सुनावली याची कारणे वाचली जातील.
- न्यायाधीश अंतिम निकाल आणि शिक्षा जाहीर करतील.
नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेत महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत. 13 पैकी आठ आखाडे एकत्र आले आहेत. त्यांनी हरिद्वार येथे आपले पदाधिकारी घोषित केले. त्यानुसार अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी महंत रवींद्र पुरी महाराज, उपाध्यक्षपदी दुर्गादास महाराज, महामंत्री पदी महंत राजेंद्र प्रसाद आणि राजेंद्रदास, सहसंयोजक पदी महंत शंकर दास महाराज, मंत्रीपदी वैष्णव दास महाराज तर राष्ट्रीय प्रवक्तेपदी महंत ज्ञानदास महाराज यांचे उत्तराधिकारी महंत संजय दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुंबईच्या भायखळ्यात मोहरमदरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या होत्या. या प्रकरणात आरोपी फैयाज निसार हुसैन प्रेमजी याने आपण सूडाच्या भावनेतून मुस्लीम समाजातील लोकांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्याच्या पत्नींनी सोडून दिले होते. या मागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा समज त्यांचा होता त्यातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.