
दोन भाऊ एकत्र आले ही आनंदाची बाब आहे. मात्र त्यांचे मूळ भांडण सत्तेसाठीच झाले होते आणि आता दोन्ही भावांकडे काहीच शिल्लक नाही. पण फक्त मुंबई महापालिका तरी हातात राहावी यासाठीच ठाकरे बंधुची ही नौटंकी सुरू असल्याची खरमरीत टीका भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव सेना आणि मनसेवर केली.
मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकत्र विजयी मेळावा आज (ता.5) मुंबईत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही काही नेते उपस्थित होते. आता या मेळ्यावर शिवसेना (शिंदे) आणि भाजपकडून टीका होताना दिसत आहे. तसेच याच मेळ्यावरून जेष्ठ कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी आपला रोख राज ठाकरे यांच्यावर ठेवत त्यांची तुलना रजा अकादमीच्या झाकीर नाईक यांच्याशी केली आहे. तसेच राज ठाकरे तुम आज भी झूठी बाते कर रहे हो. तुम झुठे हो. मी पुरावे देतो, असेही सदावर्तेंनी म्हटलं आहे.
मराठीच्या मुद्द्याखाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज विजयी मेळावा घेतला. यावरून आता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनीच 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला? याचं उत्तर आधी त्यांनी द्यावे अशी टीका भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच 'उद्धव ठाकरेंचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी असल्याचीही टीका बावनकुळेंनी केलीय.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही बंधुंचा आज (ता.5) मुंबईत विजयी मेळावा झाला. यावर आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आठवले यांनी, दोन्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र आले याचा आनंदच आहे. पण याचा महायुतीलाच जास्त फायदा होईल. ते एकत्र आल्याने महाविकास आघाडीत फूट पडेल आणि तिसरा गट निर्माण होईल. आम्ही सुद्धा मराठीप्रेमी आहोत, विजयी मेळावा घेण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.
सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही बंधुंचा आज विजयी मेळावा झाला. यावेळी दोघा भावांनी सरकारविरोधात तोफ डागली. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांनी, राज ठाकरे यांच्या भाषणात मराठीबाबत तळमळ होती. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्तेची, स्वार्थासाठी मळमळ दिसली. यामुळे राज्यातील मराठी माणसाच्या अपेक्षाभंग झाल्याची टीका केली आहे.
आजच मुंबईत मराठी माणसासाठी दिवाळी आणि दसरा साजरा झाला. राज्यातील मराठी माणसाची तब्बल 20 वर्षानंतर इच्छा पूर्ण झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अखेर एकत्र आले. यानंतर आता त्यांची युती होणार का? राज आणि उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेला एकत्र सामोरं जाणार का? असे सवाल उपस्थित केले जात होते. या प्रश्नांवर आता शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. तसेच त्यांनी इंडिया आघाडीबाबत देखील मोठे वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीची देखील चर्चा सुरू झाली आहे.
Uday Samant On Uddhav Thackeray : लिंबू मिरचीवर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल - उदय सामंत
उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार प्रहार केला. यावेळी ठाकरे यांनी, फडणवीस यांनी, आमच्यामधील आंतरपाट दूर केला. आता आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच. पण अनेक बुवा, महाराज हे सध्या बिझी असून कुणी लिंबं कापतंय, कुणी गावाकडं जाऊन अंगारे धुपारे करतयं तर कोण रेडे कापत असेल, अशी टीका केली होती. या टीकेला उदय सामंत प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी, लिंबू मिरचीवर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल, एवढं मी सांगतो. माझ्याबरोबर 3 ते 4 लोकांना अशी पत्रकार परिषद घ्यावी लागेल असाही इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.