Shivsena UBT: उद्धवसाहेब, डरो मत.. चिंता मत करो : ६ खासदार फुटलेल्या धक्क्यात ठाकरेंना ढाण्या वाघाने दिला धीर

Uddhav Thackeray, Sanjay Raut, Shiv Sena Defection: ठाकरे गटाचे ६ खासदार नॉट रिचेबल असल्याने राजकीय खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी बंडखोरांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले, तर भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंना धीर देत 'डरो मत' म्हटले आहे.
Bhaskar Jadhav-Uddhav Thackeray
Bhaskar Jadhav-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Defection: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नऊपैकी सहा खासदार मंगळवार (ता. १६) मध्यरात्री पासून नॉट रिचेबल आहेत. हे सर्व खासदार शिवसेनेच्या वर्धापन दिनी (१९ जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या सर्व घटनाक्रमानंतर आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.

राजीनामा द्या आणि जायचंय तिथं जा

आता, खासदार फुटल्यानंतर ठाकरेंच्या २० आमदारांपैकी १६ आमदार देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच आज (बुधवार) दिल्लीत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्यांना जायचंय त्यांनी राजीनामा द्या आणि जायचंय तिथं जा, असे ठणकावून सांगितले आहे.

Bhaskar Jadhav-Uddhav Thackeray
Maharashtra Politics: मोठी बातमी: महाराष्ट्राचं राजकारण लवकरच हादरणार, तब्बल 50 आमदार फुटण्याच्या तयारीत...; ठाकरेंच्या खासदारानं फोडली आतली बातमी

नगरसेवक पण फुटणार?

खासदार नॉट रिचेबल झाल्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबईतील नगरसेवक तरी सांभाळून दाखवा, असे चॅलेंज केल्याने आता ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवक पण फुटणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. ठाकरेंचे मुंबई महापालिकेत ६५ नगरसेवक आहेत. त्यापैकी ३८ ते ४० नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

उद्धवसाहेब, डरो मत..

अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंना धीर दिला आहे. ''शेवटी जे घडत आहे ते घडणारचं आहे, त्याची फार मोठी चिंता पक्षप्रमुखांनी करू नये" असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलासा दिला आहे.

Bhaskar Jadhav-Uddhav Thackeray
Shiv Sena UBT news : ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब होण्याआधीच ठाकरेंचे तीन खासदार आले समोर; राऊत म्हणाले, जो काय राडा व्हायचाय तो होईल...

"ये दिन भी निकल जायेंगे, हे दिवस सुद्धा निघून जातील, हे दिवस निघून जाण्यासाठी आपल्याला काही निर्णय करावे लागतील. काही भूमिका ठरवावी लागेल. मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेल, की डरो मत.. बिलकुल डरो मत..जो होनेवाला हैं, वो होनेही वाला हैं". असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com