
Mumbai, 07 July : विधानसभेत पुरवणी मागण्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकांना निधीसाठी साकडे घातले. ते घालताना आमदार पवार यांनी अलंकारिक भाषेतून अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. ‘अजितदादा, तुम्ही सर्व गावीकडे बघत आहात. गावीकडे बघत असताना जरा भावकीकडेही बघावं, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघात कुसडगाव (ता. जामखेड) येथे राखीव पोलिस बल गटाचे पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. केंद्राच्या पहिल्या फेजचे काम बऱ्यापैकी झाले आहे.आता दुसऱ्या फेजचे काम करावे लागेल. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही वास्तू अत्यंत महत्वपूर्ण आहे, त्यातून तेथील जनतेला मदत होणार आहे. तसेच बीड, धाराशिव, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठीही या केंद्राची मदत होणार आहे.
कर्जत आणि जामखेड शहरासाठी आपण अनेक सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर केले होते. तसेच त्यासाठी सेंट्रलाईज सिस्टिमही मंजूर करण्यात आली होती. त्याला सर्व विभागाच्या मान्यताही मिळालेल्या आहेत. पण दुर्दैव असं की सरकार बदल्यानंतर त्या ठिकाणी निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे मी महायुती सरकारला (Mahayuti Government) विनंती करतो की लवकरात लवकर या कामासाठी निधी देण्यात यावा. जेणेकरून कर्जत आणि जामखेड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राखण्यासाठी तेथील पोलिस प्रशासनाला मदत होईल, असेही आमदार पवार यांनी नमूद केले.
ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात खर्डा, मिरजगाव या ठिकाणी पोलिस ठाणे मंजूर केली होती. त्या ठिकाणी पोलिस प्रशासनही मोठ्या प्रमाणात आहे. पण त्या पोलिस ठाण्याला इमारत नाही. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था नाही. सरकारला आमची विनंती आहे की, या दोन्ही पोलिस ठाण्याला इमारती बांधण्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात मिळावा, अशी विनंती करतो
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जत जामखेडला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. कदाचित त्यावेळी काही लोक आमच्या जवळ होती. अजितदादा त्या ठिाकणी मोठ्या प्रमणात निधी देत होते. पण, दुर्दैवाने पुढच्या काळात अपने झाले पराये.....नाही तर असं म्हणता येईल की, अपनों को किया पराया... माझ्या मतदारसंघात निधी येणे कमी झाले आहे. पण, शेवटी अपने तो अपने होते है. त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो की, सर्व गावकीकडे तुम्ही बघत आहात. गावीकडे बघत असताना जरा भावकीकडेही बघावं, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.
ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात विकास कामांसाठी, तिथं असणाऱ्या लोकांच्या भवितव्यासाठी राजकारण बाजूला ठेवून निधी देण्यात यावा. ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं आहे, त्याला करू द्या. पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातील आहेत. खास करून गृहविभागाच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यासाठी निधी देण्यात यावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.