SRPF Constable : लोकभवनातील पोलीस शिपाई मृत्यू प्रकरणाला नवं वळण : स्वतःवरच झाडलेल्या गोळीमागे प्रेमसंबंध? तपासात धक्कादायक खुलासा

Rajbhavan SRPF Constable Kaustubh Sangle Case : मुंबईतील मलबार हिल येथील लोकभवन (राजभवन) येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली.
SRPF constable Kaustubh Sangle death mystery
SRPF constable Kaustubh Sangle death mysterysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकभवनात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. ड्युटीवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे (वय 26) यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. या आत्महत्येमागील नेमकं कारण काय, याचा तपास मलबार हिल पोलीस अधिक वेगाने करत आहेत. याचदरम्यान धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. प्राथमिक तपासात एका महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे संशय वाढला असून प्रेमसंबंधांचा पैलू समोर आला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकाने परिसराची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. आता कौस्तुभ सांगळे यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय, याचा तपास पोलीस अधिक वेगाने करत आहेत.

कौटुंबिक, वैयक्तिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे ही घटना घडली का, याचा तपास सुरू असून त्यांच्या सहकारी जवानांकडेही चौकशी केली जात आहे. यामुळे राज्य राखीव पोलीस दलात एकच खळबळ उडाली. कौस्तुभ सांगळे हे कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट-16 मध्ये कार्यरत होते.

SRPF constable Kaustubh Sangle death mystery
Mumbai News : धक्कादायक! मुंबईत लोकभवन येथे SRPF जवानाचा मृत्यू : ऑन ड्युटी असताना स्वतःवरच झाडली गोळी

याच तपासादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली असून या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. ABP माझाच्या वृत्तानुसार तपासादरम्यान प्रेमसंबंधांचा पैलू समोर आला असून, कौस्तुभ सांगळे यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यात विवाहाबाबत चर्चा झाली होती. मात्र, नंतर हे नाते पुढे गेले नाही. संबंधित महिला कॉन्स्टेबलने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत निश्चित केला.

या सर्व घडामोडींमुळे कौस्तुभ सांगळे मानसिक तणावाखाली गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यांनी संबंधित महिलेसोबतचे काही खाजगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवल्याचेही समोर आले आहे. हे फोटो कोणत्या उद्देशाने पाठवले गेले आणि या कारणामुळे कौस्तुभ सांगळे व संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्यात काही वाद झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

SRPF constable Kaustubh Sangle death mystery
SRPF Recruitment Case: दौंड SRPF पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर; युनिटचा 'कमांडंट'च निघाला 'मास्टरमाईंड'

तसेच, कौस्तुभ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकदा संबंधित महिला कॉन्स्टेबलला फोनवरून असा टोकाचा निर्णय घेण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, कौस्तुभ आत्महत्या करू शकतात, याची कल्पना संबंधित महिला कॉन्स्टेबलने यापूर्वीच भाईंदर पोलिसांना दिल्याचीही चर्चा आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे. तसेच, कौस्तुभ यांचे समुपदेशन सुरू होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com